
तस्मानियाहून २ ऑगस्टला उड्डाण केलेले विमान अद्याप बेपत्ता आहे.
मागील २२ दिवस शोधमोहीम चालू असूनही काहीच सुराग मिळाला नाही.
विमानाचा मलबा किंवा प्रवाशांचा काही पत्ता लागत नाही.
गेल्या काही दिवासापूर्वी एअर इंडिया एअरलाइन्सच्या विमानाचा मोठा अपघात घडला होता. आता पुन्हा एकदा एका प्रवासी विमानाचा अपघात झालाय. २३९ प्रवाशां घेऊन जाणारं विमान आकाशात गायब झाले आहे. मलेशियन फ्लाइट MH370 आठवतेय का? हे विमान ८ मार्च २०१४ रोजी क्वालालंपूरहून बीजिंगला जाणारे हे फ्लाइट अचानक बेपत्ता झालं होतं. आता तसेच एक विमान आकाशात गायब झालंय.
त्या मलेशियन विमानाचा अजून थांगपत्ता लागला नाहीये. तो विमान अपघात अजून रहस्य बनलंय. आता ऑस्ट्रेलियातील एका घटनेने या विमानाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. ऑस्ट्रेलियातील एक विमान गायब झालंय. दोन जणाला एक प्रवासी विमान २ ऑगस्ट २०२५ पासून बेपत्ता झाले आहे. जवळपास २२ दिवसांनंतरही विमानाचा कोणताही पत्ता लागलेला नाहीये.
एक वृत्तपत्राच्या बातमीनुसार, विमानात ७२ वर्षीय ग्रेगरी वॉन आणि ६६ वर्षीय त्यांची जोडीदार किम वार्नरसह त्यांचा श्वान मौली बसले होते. ग्रेगरी विमान चालवत होते. २ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता तस्मानियातील जॉर्जटाऊन विमानतळावरून विमानाने उड्डाण केले. वृत्तानुसार, विमानाला आधी विक्टोरिया येथे नेण्यात आलं. नंतर तेथून न्यू साउथ वेल्सच्या हिलस्टन विमानतळाकडे विमानाने उड्डाण केलं. परंतु विमान आकाशातच गायब झालंय.
मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळपर्यंत विमानाकडून कोणतीही माहिती न मिळाली नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी धोक्याची घंटा वाजवली. त्यानंतर शोध सुरू करण्यात आला. ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांनी उत्तर तस्मानिया, बास स्ट्रेट आणि व्हिक्टोरियामध्ये अनेक हेलिकॉप्टर, बोटी आणि जहाजांच्या मदतीने शोध सुरू करण्यात आलाय. दरम्यान गेल्या २२ दिवसांपासून विमानाचा शोध सुरूय पण अद्याप विमानाबाबत कोणतीच अपडेट मिळाली नाहीये.
बचाव पथकाला विमानाचे अवशेष सुद्धा सापडले नाहीये. तर विमानातून कोणतेही आपत्कालीन सिग्नल पाठवले गेले नाहीत, ज्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याप्रकरणी माहिती देताना पोलीस अधिकारी नील क्लार्क म्हणाले, वॉन यांना विमान चालवण्याचा अनुभव आहे. त्यामुळे कोणताच इमरजन्सी कॉल विमानातून न आल्यानं आश्चर्य वाटतंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.