महिला नेत्याच्या हत्येचा कट उधळला; ISI साठी काम करणारा तरुण दहशतवाद विरोधी पथकाच्या ताब्यात

UP ATS : एटीएसने महिला नेत्याच्या हत्येचा कट उधळला आहे. ISI साठी काम करणारा तरुण दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतलं आहे.
uttar pradesh crime
UP ATS Saam tv
Published On
Summary

ISI साठी काम करणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात

आरोपीकडे पिस्तुल आणि ४ जिवंत काडतुसे जप्त

आरोपीविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल

उत्तर प्रदेशच्या एटीएसने दहशतवादी आणि ISI साठी काम करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतलं आहे. आजमगढमधून तरुणाला ताब्यात घेण्यात आलं आहे. मोहम्मद शेख असे तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडून ९ एमएम पिस्तुल आणि ४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी आरोपीविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या दहशतवादी विरोधी पथकाला पाकिस्तानचा भारतात दहशत पसरवण्याचा हेतू असल्याचं समजले. भारताची एकता धोक्यात आणण्याचा कट रचत असल्याचे एटीएसला समजले.

शहजाद भट्टी नावाचा दहशतवादी हा भारतातील तरुणांना सोशल मीडियाच्या माध्यमातून जोडण्याचा प्रयत्न करत होता. दहशतवादी शहजाद हा तरुणांची माथी भडकावून स्लीपर सेल बनवण्याचा प्रयत्न करत होता. या दहशतवादी संघटनेचा भारतात घातपात घडवण्याचा कट होता.

uttar pradesh crime
निवडणुकीआधी पेटलं 'हलाल' राजकारण? गोकुळचा हलाल सर्टिफिकेटचा वाद कशाला?

दहशतवादी संघटना ही विशिष्ट व्यक्ती आणि संस्थाची रेकी करण्यास सांगायची. तसेच संघटनेचा नेत्याची हत्या करणे आणि राजकीय कार्यालयाला बॉम्बने उडवण्याचा कट होता. या संघटनेकडून तरुणांची माथी भडकवण्याचा काम सुरू होतं. याच प्रकरणी आजमगढच्या निजामाबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या मोहम्मद शेख नावाच्या तरुणाला अटक केली.

uttar pradesh crime
Actress Hospitalised: 'वजन कमी झालं, चालताही येत नाही...'; हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझादला रुग्णालयात केलं दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद शेख, शहजाद भट्टी हे दहशतवादी संघटनेच्या माध्यमातून पाकिस्तान, दुबईमधील मोबाईल नंबरच्या माध्यमातून सोशल मीडियावर ग्रुप तयार करून विचारधारा पसरवत होते. एटीएसने ताब्यात घेतलेला तरुण हा दहशतवादी संघटनेच्या माध्यमातून तरुणांची माथी भडकावत होता . मोहम्मद शेख हा एका राजकीय पक्षाच्या महिला नेत्याचा हत्या करण्याच्या कटात सहभागी होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com