पंजाब : पंजाबमधील अबोहर येथे निवडणूक प्रचार सभेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी (CM Charanjit Singh Channi) यांच्या 'यूपी, बिहार के भैया' या वक्तव्यावर काँग्रेस आणि गांधी परिवारावर (Congress and Gandhi parivar) टीका केली. (punjab election latest marathi news)
पंतप्रधान (narendra modi) म्हणाले, "काँग्रेसच्या (congress) मुख्यमंत्र्यांनी (Charanjit Singh Channi) काल एक विधान केले ज्यामध्ये दिल्लीतील कुटुंबातील सदस्याकडून टाळ्या वाजल्या. अशा विधानांनी ते कोणाचा अपमान करत आहेत? येथे एकही गाव नाही जिथे यूपी-बिहारमधील लोक कष्ट करत नाहीत".
पंतप्रधान पुढे म्हणाले, "आम्ही कालच संत रविदासांची जयंती साजरी केली. त्यांचा जन्म कुठे झाला? बनारस (Banaras), उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh). तुम्ही संत रविदासांनाही पंजाबमधून (punjab) बाहेर काढाल का? गुरु गोविंद सिंग यांचा जन्म कुठे झाला? बिहारच्या पाटणा साहिबमध्ये. तुम्ही करणार का? गुरु गोविंदजींनाही पंजाबमधून हाकलून देणार? असा प्रश्न माेंदीनी काॅंग्रेसला विचारला.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.