

५ राज्यांमध्ये मतमोजणी सुरू असून सुरुवातीचे कल समोर आले आहेत
पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये भाजप आघाडीवर
केरळमध्ये काँग्रेसने मुसंडी मारली
३ राज्यात भाजप आघाडीवर आहे
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुचेरी या ५ राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आज लागणार आहे. या ५ राज्यांमध्ये एकूण ८२४ जागांसाठी मतदान झालं होतं. सर्व राज्यांमध्ये आज सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू आहे. सुरूवातीचा कल हाती आला आहे. सुरूवातीच्या कलानुसार कोणत्या राज्यामध्ये कोणता पक्ष आघाडीवर आणि कोणता पक्ष पिछाडीवर आहे हे आपण पाहणार आहोत...
पश्चिम बंगाल -
पश्चिम बंगालमध्ये सुरूवातीच्या कलानुसार याठिकाणी भाजप बाजी मारताना दिसत आहे. भाजप १५० जागांवर आघाडीवर आहे. तर ममता बॅनर्जी यांचा टीएमसी पक्ष ९२ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस २ जाहांवर आघाडीवर आहे. पश्चिम बंगालमध्ये एकूण २९४ विधानसभा जागांसाठी मतदान झाले होते. सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा १४८ आहे. पश्चिम बंगालमध्ये २९३ मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी सुरू आहे. याठिकाणी भाजप आणि टीएमसीमध्ये तगडी लढत झाली.
तामिळनाडू -
तामिळनाडूमध्ये सुरूवातीच्या कलानुसार, एडीएमके पक्ष ७२ जागांवर आघाडीवर आहे. तर डीएमके पक्ष ५१ जागांवर आणि विजय थलापती यांच्या पक्ष १०३ जागांवर आघाडीवर आहे. तामिळनाडूमध्ये २३४ विधानसभा जागांसाठी मतदान झाले होते. तामिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला ११८ हा बहुमताचा आकडा गाठावा लागेल. राज्यभरात ६२ मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी सुरू आहे.
केरळ -
केरळमध्ये सुरूवातीच्या कलानुसार काँग्रेस चांगलीच मुसंडी मारताना दिसत आहे. काँग्रेस पक्ष ८९ जागांवर आघाडीवर आहे. तर एलईएफटी पक्ष ४७ जागांवर आघाडीवर आहे. केरळमध्ये एकूण १४० विधानसभा जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. केरळमधील एकूण ८८३ उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. राज्यभरातील १४० मतमोजणी केंद्रावर मतमोजणी सुरु आहे.
आसाम -
आसाममध्ये सुरूवातीच्या कलानुसार भाजप बाजी मारताना दिसत आहे. भाजप ९३ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस ३० जागांवर आघाडीवर आहे. याठिकाणी सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर सुरू आहे. आसाममध्ये विधानसभेच्या १२६ जागांचा निकाल काही तासांच समोर येईल. या जागांसाठी ७२२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.
पुदुचेरी -
पुदुचेरीमध्ये सुरूवातीच्या कलानुसार भाजप बाजी मारताना दिसत आहे. याठिकाणी भाजप २२ आणि काँग्रेस ६ जागांवर आघाडीवर आहे. पुदुचेरीची विधानसभा लहान असली तरी तिचे राजकीय महत्त्व जास्त आहे. येथे एनडीएला आघाडी मिळण्याची शक्यता आहे. याठिकाणी विधानसभेच्या ३० जागांसाठी मतदान पार पडले होते. ६ मतमोजणी केंद्रावर मतमोजणी सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.