Assembly Bypolls: बिहार, हिमाचलसह ७ राज्यांच्या १३ विधानसभा जागांवर पोटनिवडणूक; मतदान आणि निकाल कधी?
Assembly BypollsSaam TV

Assembly Bypolls : आता ७ राज्यांत पोटनिवडणुकीची रणधुमाळी, विधानसभांच्या १३ जागांसाठी होणार मतदान; निकाल कधी?

Bihar And Himachal Pradesh Assembly Bypolls: विधानसभेच्या विद्यमान सदस्यांच्या निधनामुळे किंवा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागांवर येत्या १० जुलै रोजी पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने आज या विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची तारीख जाहीर केली.

भारत निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) बिहार, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हिमाचल प्रदेशमधील १३ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक (Assembly Constituencies Bypolls) घेण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. पुढच्या महिन्यात १० जुलै रोजी ही पोटनिवडणूक होणार आहे. तर १३ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.

निवडणूक आयोगाने सोमवारी पश्चिम बंगालमधील ४ जागांसह सात राज्यांतील १३ विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. विद्यमान सदस्यांच्या निधनामुळे किंवा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने आज या विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची तारीख जाहीर केली. याठिकाणी १० जुलैला मतदान आणि १३ जुलैला निकाल लागणार आहे.

Assembly Bypolls: बिहार, हिमाचलसह ७ राज्यांच्या १३ विधानसभा जागांवर पोटनिवडणूक; मतदान आणि निकाल कधी?
Miachel Mosley: प्रसिद्ध टीव्ही प्रेझेंटर डॉ मायकेल मॉस्ले यांचा मृतदेह ग्रीक बेटावर सापडला; सुट्टीवर असताना झाले होते बेपत्ता

ज्या विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. त्यामध्ये बिहारच्या रुपौली मतदारसंघ, पश्चिम बंगालचा रायगंज मतदारसंघ, राणाघाट दक्षिण मतदारसंघ, बागडा मतदारसंघ आणि मानिकतला मतदारसंघ, तामिळनाडूचा विक्रवंडी मतदारसंघ, मध्य प्रदेशचा अमरवाडा मतदारसंघ, उत्तराखंडचा बद्रीनाथ मतदारसंघ आणि मंगलौर मतदारसंघ, पंजाबचा जालंधर पश्चिम मतदारसंघ आणि हिमाचल प्रदेशचा हमीपूर मतदारसंघ आणि नालागड मतदारसंघाचा समावेश आहे.

Assembly Bypolls: बिहार, हिमाचलसह ७ राज्यांच्या १३ विधानसभा जागांवर पोटनिवडणूक; मतदान आणि निकाल कधी?
Share Market Update: गुडन्यूज! मोदी सरकारच्या शपथविधीनंतर शेअर बाजारात वारं फिरलं; सेन्सेक्स सुसाट, निफ्टीनेही घेतली उसळी

या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी १४ जून रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २१ जून आहे. २४ जून रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २६ जून आहे. १० जुलै रोजी पोटनिवडणूक होणार असून १३ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. १५ जुलैपूर्वी पोटनिवडणूक पूर्ण करावयाची असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

Assembly Bypolls: बिहार, हिमाचलसह ७ राज्यांच्या १३ विधानसभा जागांवर पोटनिवडणूक; मतदान आणि निकाल कधी?
Modi Cabinet 2024: मोदी सरकारमधील सर्वात श्रीमंत मंत्री; ४८ वर्षीय चंद्र शेखर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, संपत्ती वाचून म्हणाल...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com