Assam Earthquake: साखर झोपेत असताना आसाममध्ये भूकंपाचे तीव्र झटके; पहाटे पाच वाजता लोकांची धावपळ

Earthquake News: आसाममधील तेजपूरमध्ये आज सकाळी (२७ डिसेंबर )भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. जम्मू काश्मीर आणि लेह लडाखनंतर आता आसाममध्येही भूकंपाचा धक्का बसला आहे.
Assam Earthquake
Assam EarthquakeSaam Tv
Published On

Assam Earthquake 3.4 Richter Scale:

आसाममधील तेजपूरमध्ये आज सकाळी (२७ डिसेंबर )भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. जम्मू काश्मीर आणि लेह लडाखनंतर आता आसाममध्येही भूकंपाचा धक्का बसला आहे. यामुळे आसाममधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेकजण बचावासाठी घराबाहेर आणि ऑफिसबाहेर पडले. नॅशनल सेंटर सिस्मॉलॉजीनुसार, बुधावारी पहाटे ५.५३ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ३.४ रिश्टर स्केल आहे. (Latest News)

एका रिपोर्टनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या पृष्ठभागापासून २० किलोमीटर खोलीवर होता. या भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिक बचावासाठी घर आणि ऑफिसच्या बाहेर धावत सुटले. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा वित्त हानी झाली नसल्याचे समजत आहे.

याआधीही भारतात अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहे. २६ डिसेंबरला लेह, लडाखमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता ४.५ रिश्टर स्केल होती. भूकंपाचा केंद्रबिंदू कारगिलमध्ये १० किलोमीटर भूगर्भात होता. लडाखसोबत जम्मू काश्मीरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते.

Assam Earthquake
Deepfake : डीपफेकबाबत मोदी सरकारचं मोठं पाऊल; सोशल मीडियासाठी केंद्राच्या गाइडलाइन्स

भूकंप का होतात?

पृथ्वीचा पृष्ठभाग हा सात टेक्टोनिक प्लेट्सपासून बनलेला आहे. या प्लेट्स सतत फिरत असतात. ज्या भागात या प्लेट्स एकमेकांवर आदळतात त्याला फॉल्ट लाइन म्हणतात. प्लेट्स एकमेकांवर आदल्यामुळे जास्त दाब तयार होतो आणि प्लेट्स तुटतात. त्यामुळे भूकंप होतो आणि जमिन हादरु लागते. या प्लेट्स जमिनीच्या तब्बल ३०- ५० किलोमीटर खाली असतात.

Assam Earthquake
WFI Controversy: 'मी देशद्रोही आहे का?', कुस्तीपटू विनेश फोगटने पंतप्रधान मोदींना पत्र लिहीत खेलरत्न पुरस्कार केला परत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com