Earthquake In Himalayas: हिमालयात येणार मोठा भूकंप? भारतीय वैज्ञानिकांची भविष्यवाणी ठरणार खरी?

Earthquake In Himalayas: तुर्कमेनिस्तान, कझाकिस्तान, भारत , पाकिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, चीन, अफगाणिस्तान आणि किर्गिमेनिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानंतर हिमालयात कधीही मोठा भूकंप येऊ शकतो असा इशारा भारताच्या डेहराडून येथील वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयीन जिऑलॉजीच्या शास्त्रज्ञांनी दिला होता.
Earthquake In Himalayas
Earthquake In HimalayasSaam Digital

Earthquake In Himalayas

भारत, चीन आणि पाकिस्तानमध्ये आलेल्या भूकंपाचं केंद्र एकच होतं, ते म्हणजे हिमालय. १८ डिसेंबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास ४.० रिस्टर स्केलचा भूकंप झाला. त्यानंतर झंस्कर, लडाखमध्ये सव्वा चार वाजता ५.५ रिस्टर स्केलचा भूकंपाचे धक्के जाणवले. किश्तवाडमध्ये दुपारी ४ वाजता ४.८ स्केलचा दुसरा भूंकप आला. त्यानंतर चीनमध्ये ६.२ रिस्टर स्केलचा भूकंप आला यात शेकडो चीनी नागरिकांचा मृ्त्यू झाला आहे.

अफगाणिस्तानमध्ये मार्चमध्ये आलेल्या ६.६ रिस्टर स्केलच्या भूकंपानंतर संपूर्ण दक्षिण आशियया हादरला होता. तुर्कमेनिस्तान, कझाकिस्तान, भारत , पाकिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, चीन, अफगाणिस्तान आणि किर्गिमेनिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानंतर हिमालयात कधीही मोठा भूकंप येऊ शकतो असा इशारा भारताच्या डेहराडून येथील वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयीन जिऑलॉजीच्या शास्त्रज्ञांनी दिला होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Earthquake In Himalayas
Women IPS-IAS Officer News: सोशल मीडियावरील फोटोवरून महिला IPS-IAS अधिकाऱ्यांमध्ये जुंपली, कोर्ट म्हणालं....

हिमालयात खरोखरच मोठा भूकंप होणार आहे का? यावर इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयीन जिऑलॉजीचे शास्त्रज्ञ डॉ. अजय पॉल म्हणाले, ज्यावेळी टेक्टॉनिक प्लेट्समधून उर्जा उत्सर्जित होते त्यावेळी भूकंप होतो. आपण सिस्मिक झोन ५ मध्ये आहोत त्यामुळे कधी आणि कुठे भूकंप होईल याचा अंदाज बाधणं कठीण असतं. अफगानिस्तानमध्ये आलेल्या भूकंपाची खोली खूप जास्त होती. मात्र सध्या ज्या पद्धतीने एकाच पट्ट्यात भूकंपाची मालिका सुरू आहे, त्यानुसार हिमालयात कधीही मोठा भूकंप येऊ शकतो, असं अंदाज पॉल यांनी केला आहे.

Earthquake In Himalayas
Chhavi Mittal Video: मोठा अनर्थ टळला! सेटवर अभिनेत्रीसोबत घडली मोठी दुर्घटना, अचानक केसांना लागली आग अन्...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com