WFI Controversy: 'मी देशद्रोही आहे का?', कुस्तीपटू विनेश फोगटने पंतप्रधान मोदींना पत्र लिहीत खेलरत्न पुरस्कार केला परत

Vinesh Phogat: संजय सिंह कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर खेळाडूंनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. यानंतर क्रीडा मंत्रालयाने या संघटनेच्या संपूर्ण कार्यकारिणीला निलंबित केलं, तरीही खेळाडूंचा राग शांत झालेला नाही.
Vinesh Phogat to Return Khel Ratna,
Vinesh Phogat to Return Khel Ratna,Saam Tv
Published On

Vinesh Phogat to Return Khel Ratna:

लैंगिक छळाचे आरोप असलेले भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर पुन्हा एकदा खेळाडूंनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. यानंतर क्रीडा मंत्रालयाने या संघटनेच्या संपूर्ण कार्यकारिणीला निलंबित केलं.

मात्र तरीही खेळाडूंचा राग शांत झालेला नाही. साक्षी मलिक आणि बजरंग पुनियानंतर आता विनेश फोगटनेही मोठी घोषणा केली आहे. तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुले पत्र लिहून अर्जुन पुरस्कार आणि खेलरत्न परत करण्याची घोषणा केली आहे. ''आम्हाला देशद्रोही म्हटले गेले. मी देशद्रोही आहे का?'', असं तिने आपल्या पत्रात लिहिलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Vinesh Phogat to Return Khel Ratna,
Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीसाठी 'मविआ'चा जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असेल? वंचितने सांगितला संपूर्ण प्लान

फोगटने आपल्या पत्रात लिहिले आहे की, गेल्या काही वर्षात महिला कुस्तीपटूंनी जे काही अनुभवले आहे, त्यावरून आपण किती गुदमरून जगत आहोत, हे समजून घेतले पाहिजे. आता साक्षीही निवृत्त झाली आहे. जे शोषण करणार आहेत त्यांनीही आपले वर्चस्व जाहीर केले आहे.  (Latest Marathi News)

तिने लिहिलं अहे की, ''फक्त पाच मिनिटे काढा आणि त्या माणसाने मीडियाला दिलेली विधाने ऐका. त्याने काय केले ते तुम्हाला कळेल. त्यांनी महिला कुस्तीपटूंचे वर्णन मंथरा असे केले आहे. याहून गंभीर बाब म्हणजे त्यामुळे अनेक महिला कुस्तीपटूंना माघार (कुस्ती खेळ सोडावा लागला) घ्यावी लागली. हे खूप भीतीदायक आहे.''

Vinesh Phogat to Return Khel Ratna,
Mumbai News: अर्धा तास आधी बायकोशी व्हिडिओ कॉलवर बोलणं झालं, पण एका मांजाने अख्ख कुटुंब उद्ध्वस्त केलं

विनेशने पुढे लिहिले की, ही घटना विसरणे सोपे नाही. सर, मी तुम्हाला भेटली, तेव्हा हे सर्व सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही न्यायासाठी लढा देत आहोत. आमची काळजी कोणी घेत नाही. आमच्या पदकांची किंमत 15 रुपये असल्याचे बोलले जात आहे. पण ही पदके आपल्याला प्राणापेक्षाही प्रिय आहेत. जेव्हा आम्ही न्यायासाठी आवाज उठवला तेव्हा आम्हाला देशद्रोही म्हटले गेले. मला विचारायचे आहे की, मी देशद्रोही आहे का?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com