शिलॉंग : आसाम Assam आणि मिझोराम Mizoram या दोन राज्यांत नागरिकांमध्ये राज्यांच्या सीमांवरून borders भयंकर आणि जोरदार हिंसाचार Violence निर्माण झाला आहे. सोमवारी झालेल्या हिंसाचाराला आवर घालण्याचे कर्तव्य बजावत असताना आसामच्या ६ पोलीस Police जवान धारातिर्थी पडले आहेत. इतर ५० पोलीस जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सिलचर मधील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
आसाम आणि मिझोराम मधील नागरिकांमध्ये सीमेवरून मागील काही वर्षांपासून संघर्ष सुरु आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ईशान्येकडे असलेल्या राज्यांच्या सर्व मुख्यमंत्र्यांन बरोबर शिलॉंग Shillong या ठिकाणी बैठक बोलावली होती. या बैठकीला २ दिवस होण्याअगोदरच पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला आहे. दोन्हीकडचे नागरिक एकमेकांना चांगलेच भिडलेले दिसून येत आहेत.
हे देखील पहा-
या जमावाला आवर घालत असताना काही पोलीस जखमी झाले आहेत. त्यामध्ये ६ जणांना आपले प्राण देखील गमावावे लागणार आहेत. आसाम आणि मिझोरामच्या सीमालगत राहणाऱ्या ८ शेतकऱ्यांच्या झोपड्यांना आग लागल्याच्या शुल्लक कारणावरून हा हिंसाचार उफाळला आहे. अज्ञात समाज कंटकानी ही आग लावलेली असून, त्याचा शोध सध्या पोलीस करत आहेत.
मात्र, या आगीच्या कारणाने मागील काही दिवसांपासून वाढत चाललेल्या धुसफुशीला चांगलेच कारण मिळाले आणि संघर्षाला तोंड फुटले आहे. दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हिंसाचाराकरिता एकमेकांवर जबाबदारी ढकलेली आहे. केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाची मागणी देखील यामध्ये केलेली आहे. दोन्ही राज्यांमध्ये नागरिक आणि पोलीस हे सीमेवर आमने- सामने आल्याने संघर्ष हा वाढला आहे.
अनेक ठिकाणी छोट्या- मोठ्या हिंसाचाराच्या घटना हे घडतच आहेत. पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. दोन्ही बाजूचे पोलीस जखमी होत असल्याचे चित्र आता दिसून येत आहे. गृहमंत्री अमित शाह या प्रकरणात अधिक लक्ष घातले आहे. आसाम आणि मिझोराम या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सामोपचाराने तोडगा काढण्याची विनंती यामध्ये केली जात आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.