संकट काळात परिवहन मंत्री स्वत: बनले नाविक; रुग्णास पाेहचविले दवाखान्यात (व्हिडिओ पाहा)

आसामचे परिवहन मंत्री परिमल सुक्लाबैद्य सध्या स्थानिक आमदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बराक खोऱ्यातील पूरस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
Parimal Suklabaidya, Assam Flood, Assam.
Parimal Suklabaidya, Assam Flood, Assam.saam tv
Published On

आसाम : आसाम (assam flood news) राज्यात पुरामुळे नागरिकांची बिकट अवस्था झाली आहे. पूराचे पाणी घरात शिरत असल्याने हजारो नागरिकांना स्थलांतरित व्हावे लागत आहे. याबराेबचर शेकडाे नागरिक आजारी पडू लागले आहेत. राज्यातील बहुतांश भागात रुग्णालयात देखील नागरिकांना जाता येत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान या परिस्थितीत नागरिकांच्या मदतीला आसामचे परिवहन मंत्री परिमल सुक्लाबैद्य (Parimal Suklabaidya) हे धावून आले आहेत. ज्या भागात माेठ्या प्रमाणात पाणी साचले आहे आणि नागरिकांना मदतीची गरज आहे ते परिमल सुक्लाबैद्य हे स्वतः नाव चालवत नागरिकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढून रुग्णालयात नेत आहेत. त्यापैकी त्यांचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमात (Social Media) व्हायरल (Viral) होत आहे. (Parimal Suklabaidya Latest Marathi News)

आसाम (assam) राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यात ब्रह्मपुत्रा तसेच बराक या नद्या अन्य छाेट्या नद्यांसह दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. राज्यातील सुमारे 35 जिल्ह्यांपैकी 32 जिल्ह्यांस पूराचा फटका बसला आहे. या स्थितीत आसामचे परिवहन मंत्री परिमल सुक्लाबैद्य हे नागरिकांना मदत करण्यासाठी काेणतीही कमतरचा साेडत नाहीयेत. त्यांनी पूरात अडकलेल्या नागरिकांसाठी नाव देखील चालविली. एक नागरिक डायलिसिसवर आहे आणि त्यास मदतीची गरज असल्याचे त्यांचे कानावर पडले. सुक्लाबैद्य यांनी तातडीने एक नाव चालवत संबंधित रुग्णास नावेतून रुग्णालयात नेले.

Parimal Suklabaidya, Assam Flood, Assam.
सात दिवसांसाठी 70 खोल्या बुक; खाण्यापिण्यासह एकनाथ शिंदेंचा दररोज हाेताेय इतका खर्च

एनडीटीव्हीच्या वृत्तानूसार सध्या राज्यात काही ठिकाणी पुराचे पाणी कमी झाले आहे. मंत्री नेत असलेल्या नावेजवळ येण्यापुर्वी नागरिकांना गुडघ्यापर्यंत पाण्यात चालावे लागत आहे असे दिसत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Parimal Suklabaidya, Assam Flood, Assam.
President Election : राष्ट्रपतिपदासाठी द्रौपदी मुर्मूंचा अर्ज दाखल
Parimal Suklabaidya, Assam Flood, Assam.
सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेकडे 'हे' दोन पर्याय, उद्धव ठाकरे कोणती भूमिका घेणार?
Parimal Suklabaidya, Assam Flood, Assam.
बंडखाेरांना धडा शिकविण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल; पाच वर्षांची बंदी घालण्याची मागणी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com