

आसाममध्ये भाजप स्पष्ट बहुमताकडे वाटचाल
भाजप सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार
हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली भाजपची हॅटट्रिक
भाजपकडून काँग्रेसला मोठा झटका
आसाम विधानसभा निवडणुकीतील मुख्य लढत मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी आघाडी यांच्यात पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालांची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार आसाममध्ये भाजप सलग तिसऱ्यांदा विजयाची हॅट्रिक करताना दिसत आहे. आसामध्ये भाजप सत्ता स्थापन करणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
भाजप काँग्रेसला जोरदार टक्कर देत आहे. आतापर्यंतच्या कलानुसार, आसाममध्ये भाजप ९५ जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस अवघ्या २९ जागांवर आघाडीवर आहे. तर इतर फक्त २ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे भाजप पुन्हा आसाम विधानसभेवर आपला झेंडा फडकवणार हे निश्चित झाले आहे. आसामध्ये हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखालील भाजप हॅट-ट्रिक करताना दिसत आहे. भाजपने काँग्रेसचा दणदणीत पराभव केला आहे.
पहिल्या एका तासातच भाजपने बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ६३ जागांचा आकडा ओलांडून ७१ जागांवर आघाडी घेतली. दरम्यान काँग्रेसला फक्त १६ जागांवरच आघाडी मिळवता आली. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजप ९५ तर काँग्रेस २९ जागांवर आघाडीवर आहे. सुरुवातीच्या कलांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. आसाममध्ये भाजप तिसऱ्यांचा सत्ता स्थानप करणार असल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष सुरू आहे.
१२६ जागांच्या विधानसभेतील ११० जागांचे कल आतापर्यंत जाहीर झाले असून त्यात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी मजबूत स्थितीत असल्याचे दिसत आहे. ताज्या कलानुसार एनडीए स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहे. काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष २९ जागांवर आघाडीवर असले तरी तरी त्यांना बहुमताच्या आकडा गाठणं कठीण झाले आहे. हे केवळ सुरुवातीचे कल असून अंतिम निकाल अजून जाहीर व्हायचे आहेत.
दरम्यान, आसाममध्ये भाजपने एजीपी आणि यूपीपीएलसोबत युती करून निवडणूक लढवली. तर काँग्रेसने एआययूडीएफसह अनेक पक्षांसोबत युती केली. निवडणूक प्रचारादरम्यान बांगलादेशी घुसखोरी, एनआरसी, नागरिकत्व सुधारणा कायदा, पूर, बेरोजगारी, चहाच्या मळ्यांतील कामगारांचे प्रश्न आणि विकास हे प्रमुख मुद्दे गाजले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी याठिकाणी सभा झाल्या होत्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.