Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना हायकोर्टाचा धक्का; तात्काळ सुनावणी करण्यास दिला नकार

Arvind Kejriwal Latest news : अरविंद केजरीवाल यांनी सुटकेसाठी दिल्ली हायकोर्टाचा दरवाजा ठोठवला. त्यांनी २४ मार्चपर्यंत तत्काळ सुनावणीची मागणी केली. मात्र, हायकोर्टाने तत्काळ सुनावणी करण्यास नकार दिला.
Delhi CM Arvind Kejriwal
Delhi CM Arvind KejriwalSaam Digital

Arvind Kejriwal News :

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. केजरीवाल यांना कथित मद्य विक्री धोरण घोटाळ्याप्रकरणी अटक करत २८ मार्चपर्यंत ईडी कोठडी मिळाली आहे. ईडीने अटक केल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुटकेसाठी दिल्ली हायकोर्टाचा दरवाजा ठोठवला. त्यांनी २४ मार्चपर्यंत तत्काळ सुनावणीची मागणी केली. मात्र, हायकोर्टाने तत्काळ सुनावणी करण्यास नकार दिला. (Latest Marathi news)

आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी अटक आणि ईडी कस्टडीला कोर्टात याचिका दाखल करत आव्हान दिलं. मात्र, दिल्ली हायकोर्टाने अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्यास नकार दिला.

अरविंद केजरीवाल यांनी याचिकेत अटक आणि ईडी कस्टडी बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे. केजरीवाल यांनी शनिवारी याचिकेवर सुनावणी करण्याची मागणी केली होती. परंतु या प्रकरणात २७ मार्चला सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Delhi CM Arvind Kejriwal
Nitin Gadkari : राहुल गांधी, सोनिया गांधी यांनीही माझं कौतुक केलं; नागपूरमधून नितीन गडकरी काय म्हणाले? जाणून घ्या

२७ मार्चला सुनावणीची शक्यता

याचिकेवर तत्काळ सुनावणी करण्यास हायकोर्टाने नकार दिला. ईडीने कोर्टाकडून केजरीवाल यांची दहा दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र, कोर्टाने केजरीवाल यांना दहा दिवसांची ईडी कोठडी दिली. या प्रकरणात आता केजरीवाल यांना २८ मार्चला पीएमएलए कोर्ट हजर करण्यात येणार आहे.

Delhi CM Arvind Kejriwal
Arvind Kejriwal : 'मी तुरुंगात असो किंवा बाहेर...'; पत्नी सुनीता यांनी वाचून दाखवला CM केजरीवाल यांचा संदेश

'आप'चं मुख्य कार्यालय सील : आतिशी

आप नेत्या आतिशी यांना दावा केला आहे की, 'आपचं मुख्य कार्यालय सील करण्यात आलं आहे. या वरून निवडणूक आयोगात तक्रार करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मात्र, दिल्लीच्या एका पोलीस अधिकाऱ्याने कार्यालय सील केल्याच्या आरोपाचं खंडन केलं आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की,'डीडीयू मार्गावरील लोकांची गर्दी नियंत्रणात करण्यासाठी पोलिसांना तैनात करण्यात आलं होतं. त्या ठिकाणी १४४ कलम लागू करण्यात आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com