CCTV तून तुमच्या घरावर चीनची नजर? भारत सरकारने दिले हेरगिरीचे संकेत

केंद्र सरकारने चिनी कंपन्यांना दोन वर्षांचा कालावधी देऊन नियमांची पूर्तता करायला सांगितली होती. त्याची मुदत संपत आली असून चीनी कंपन्यांच मार्केटमधलं वर्चस्व कमी होणार आहे.
CCTV
CCTVSaam tv Marathi news
Published On

रोहित कदम, साम टीव्ही प्रतिनिधी

तुम्ही घराच्या सुरक्षेसाठी वापरत असलेल्या सीसीटीव्हीवर बंदी येण्याची शक्यता आहे... भारत सरकारनेच याचे संकेत दिलेत... मात्र सीसीटीव्हीवर खरचं बंदी का येऊ शकते... पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...

तुमच्या घरावर चिनी बनावटीच्या सीसीटीव्हीची नजर तर नाहीये ना... भारतात सीसीटीव्हीच्या मार्केटमध्ये चीनचं वर्चस्व आहे. या स्वस्त कॅमेऱ्यामुळे घरगुती आणि व्यावसायिक वापरात याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र या माध्यमातून हेरगिरी पण होऊ शकते का...कारण

सद्यस्थितीस बहुतेक सीसीटीव्ही कॅमेरे इंटरनेटशी जोडलेले असतात. याचा अर्थ ते केवळ तुमच्या मोबाईल फोनशीच नव्हे, तर कंपनीच्या सर्व्हरशीही जोडलेले असतात. जर कॅमेऱ्याचे सॉफ्टवेअर किंवा सर्व्हर सुरक्षित नसेल, तर तुमच्या नकळत तुमचे व्हिडिओ इतर कुणाच्याही हाती लागू शकतात.

CCTV
नवी मुंबईतही 'अशोक खरात'! आदर्श म्हात्रेचे कारनामे एकूण चक्रावाल, ४०महिलांवर लैंगिक अत्याचार

हा धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने चिनी कंपन्यांना दोन वर्षांचा कालावधी देऊन नियमांची पूर्तता करायला सांगितली होती. त्याची मुदत संपत आली असून चीनी कंपन्यांच मार्केटमधलं वर्चस्व कमी होणार आहे.

कंपन्यांना कॅमेऱ्यामधील मुख्य चिपच्या (SoC) मूळ देशाची माहिती देणे आवश्यक असणार आहे.

बाहेरून हॅक होऊ शकत नाहीत याची खात्री करण्यासाठी कॅमेऱ्यांची चाचणी केली जाणार आहे.

आतापर्यंत, नवीन नियमांनुसार 500 हून अधिक सीसीटीव्ही मॉडेल्सना प्रमाणपत्र मिळाले आहे.

CCTV
मुंबईत २६४० घरांची निघाली लॉटरी, हक्काच्या घरासाठी कसा कराल अर्ज? किती असेल किंमत? वाचा A टू Z माहिती

नव्या नियमांनंतर चीनच्या आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांसाठी भारतीय बाजारपेठेचे दरवाजे बंद झालेत. चीनने भारतीय डेटाशी खेळू नये या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल टाकल्याचं बोललं जातंय. याचं कारण सध्याच्या युगात डिजिटल युद्धाची शक्यता नाकारता येत नाही. तसंच, प्रगत तंत्रज्ञानाचा वापरामुळे कॅमेरे सहज हॅक करता येऊ शकतात. त्यामुळे संवेदनशील माहिती सहज मिळवता येऊ शकते. अशावेळी भारतानं उचललेलं पाऊल डेटा सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे, एव्हंढ मात्र निश्चित...

ब्युरो रिपोर्ट, साम टिव्ही न्यूज

CCTV
खासदार होताच पार्थ पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट, 'शिवतीर्था'वर खलबतं; नेमकी चर्चा काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com