मंत्र्याच्या भावानं पोलीस कॉन्स्बेटलच्या कानशिलात लगावली, मंदिरातील सार्वजनिक कार्यक्रमात राडा; VIDEO व्हायरल

Janardhan Reddys Brother Assaults Constable: त्वरीत प्रवेश न दिल्याबद्दल मंत्री बी.सी जनार्दन रेड्डी यांच्या भावानं पोलीस कॉन्स्टेबलच्या कानशिलात लगावली. सध्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Andhra pradesh news
Andhra pradesh newsSaam Tv News
Published On

आंध्र प्रदेश सरकारचे मंत्री बी.सी जनार्दन रेड्डी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कुर्नूल येथील श्री नरसिंह स्वामी मंदिरात झालेल्या सार्वजनिक कार्यक्रमात त्वरीत प्रवेश न दिल्याबद्दल त्यांच्या बंधूंनी पोलीस कॉन्सटेबलच्या कानशिलात लगावल्याचा आरोप आहे. बुधवारी हा मंदिराच्या उद्घाटन समारंभादरम्यान, ही घटना घडल्याची माहिती आहे. यावेळी वातावरण अधिक चिघळलं. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Andhra pradesh news
तेजस ठाकरेंचं शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; राजकीय वर्तुळात खळबळ

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मंत्री बी.सी जनार्दन रेड्डी यांचे बंधू मदन भूपाल रेड्डी दिसत आहेत. ते बुधवारी कुर्नूल येथील श्री नरसिंह स्वामी मंदिरात गेले होते. मंदिराच्या उद्घाटन समारंभादरम्यान त्यांना पोलीस कॉन्स्टेबलनं रोखलं. तसेच आत जाण्यास मनाई केली. यादरम्यान, त्यांची पोलीस कॉन्स्टेबलसोबत बाचाबाची झाली. मदन भूपाल रेड्डी यांना राग अनावर झाला. त्यांनी पोलीस कॉन्स्टेबलच्या कानशिलात लगावली.

या दरम्यान, कुणीतरी या घटनेचा व्हिडिओ शूट केला. तसेच सोशल माध्यमांमध्ये व्हायरल केला. या व्हिडिओवर नेटकऱ्यांसह विरोधकांनीही टीकास्त्र डागलं आहे. विरोधकांनी टीडीपी सरकारमधील मंत्री, तसेच टीडीपी सरकारवर टीका केली आहे. या व्हिडिओतून राज्य सरकारचा अंहकार दिसून येतो, अशी टीका विरोधकांनी केली आहे.

Andhra pradesh news
'....यासारखा दुसरा विनोद नाही', कोकाटेंना क्रिडा खाते देताच, बड्या खासदाराकडून सत्ताधाऱ्यांवर सडकून प्रहार

मंत्री बीसी रेड्डी यांची प्रतिक्रिया

या घटनेवर प्रतिक्रिया देताना राज्यमंत्री बीसी जनार्दन रेड्डी म्हणतात, 'ही घटना अत्यंत दुर्देवी आहे. या घटनेनंतर एफआयआर नोंदवण्यात आला आहे हल्लेखोर कुणीही असो, त्या व्यक्तीविरोधात कठोर कारवाई करू. जनतेच्या सरकारमध्ये असे हल्ले सहन केले जाणार नाही'. असं यावेळी ते म्हणालेत.

Andhra pradesh news
कोकाटेंना दणका! आता शिंदेंच्या 'या' मंत्र्याला अलर्ट; 'बार'बाबत घेतला मोठा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com