बॅलेट पेपरवर निवडणुका अन् काँग्रेस शून्यावर; NDA किती जागांवर विजयी?

Andhra Pradesh Local Body Election Results 2026: आंध्र प्रदेश स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत TDP च्या नेतृत्वाखालील NDA चा दणदणीत विजय. 13 पैकी 12 महापौरपदे NDA ने जिंकली, तर TDP ने 2,571 प्रभागांवर विजय मिळवला.
AndhraPradeshElectionResults
AndhraPradeshElectionResultssaam tv
Published On: 

आंध्र प्रदेशमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तेलगू देसम पक्षाच्या (TDP) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने दणदणीत विजय मिळवला आहे. राज्यातील 13 पैकी तब्बल 12 महापौरपदे जिंकत NDA ने आपले राजकीय वर्चस्व सिद्ध केले आहे. तसेच आतापर्यंत जाहीर झालेल्या प्रभागांच्या निकालांमध्येही आघाडीने जवळपास दोन तृतीयांश जागांवर विजय मिळवला आहे. 4 नोव्हेंबरमध्ये जाहीर झालेल्या या निकालांमुळे वायएसआर कॉँग्रेस पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. YSRCP ला अनंतपूरमधील केवळ महापौरपद जिंकता आले. दुसरीकडे सत्ताधारी आघाडीने विशाखापट्टणम, विजयवाडा, गुंटूर, तिरूपती, नेल्लोर आणि कडप्पा यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

AndhraPradeshElectionResults
Bypoll : पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर! भाजपची २ राज्यात बाजी, काँग्रेस पराभवाच्या छायेत; विजय यांच्या TVK ने खाते उघडले

TDP ची मोठी मुसंडी; 2,571 प्रभागांमध्ये विजय

महापौरपदांच्या निकालांमध्ये तेलुगू देसम पक्षाने (TDP) 10 जागांवर विजय मिळवला आहे. तर आघाडीतील घटक पक्ष असलेल्या जनसेना पार्टीने (JSP) विजयवाडा आणि एलुरू येथील दोन महापौरपदे जिंकली आहेत. प्रभागांच्या निकालांमध्येही TDP ने मोठी आघाडी घेतली आहे. राज्यातील एकूण 3897 प्रभागांपैकी TDP ने तब्बल 2571 जागांवर विजय मिळवला आहे. म्हणजेच जवळपास 66 टक्के जागा TDP ने आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. दुसरीकडे YSRCP ला 550, जनसेना पार्टीला 484, तर भारतीय जनता पक्षाला (BJP) 153 जागा मिळाल्या आहेत. अपक्ष आणि छोट्या पक्षांनी उर्वरित 139 जागांवर विजय मिळवला आहे.

AndhraPradeshElectionResults
EVM सोडा, बॅलेट पेपरवरही भाजपचा एकतर्फी विजय; विरोधकांची अवस्था पाहून बसेल धक्का, पाहा निकाल

या निकालांमधून सत्ताधारी आघाडीतील प्रमुख पक्ष म्हणून TDP ची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. तसेच जनसेना पार्टीने दोन महापौरपदे जिंकत आघाडीतील आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. विशेष म्हणजे ही निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.