Crime News: मुलींच्या हॉस्टेलमधील बाथरूममध्ये छुपे कॅमेरे, ३०० व्हिडिओ सापडले; असा उघड झाला भयंकर प्रकार

Andhra College Scandal: एका इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलींच्या बाथरूममध्ये छुपा कॅमेरा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हे प्रकरण गुडलावलेरू कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधील आहे.
मुलींच्या हॉस्टेलमधील बाथरूममध्ये छुपे कॅमेरे, ३०० व्हिडिओ सापडले; असा उघड झाला भयंकर प्रकार
Andhra College Scandal Latest NewsSaam Tv
Published On

आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील गुडीवाडा येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील एका इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलींच्या बाथरूममध्ये छुपा कॅमेरा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हे प्रकरण गुडलावलेरू कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधील आहे.

घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्यांनी आपला संपत व्यक्त करत घोषणाबाजी सुरू केली. याप्रकरणातील आरोप एक विद्यार्थीच आहे. त्याचे नाव विजय असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

मुलींच्या हॉस्टेलमधील बाथरूममध्ये छुपे कॅमेरे, ३०० व्हिडिओ सापडले; असा उघड झाला भयंकर प्रकार
NCRB Report: 'निर्भया' ते कोलकाता प्रकरण! संताप, उद्रेकानंतरही 'ती' असुरक्षित; काय सांगतोय १२ वर्षाचा NCRB रिपोर्ट? वाचा..

मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपीचा फोन आणि लॅपटॉपही जप्त केला आहे. आरोपी हा छुप्या कॅमेऱ्यांद्वारे विद्यार्थिनींचे व्हिडिओ रेकॉर्ड करून त्यांची विक्री करत होता, असं बोललं जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत जवळपास 300 फोटो-व्हिडिओ लीक झाले आहेत. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी देखील या घटनेची गंभीर दाखल घेत याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, गुडलावलेरू कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगला आठवडाभरापूर्वी याची माहिती देण्यात आली होती. मात्र कॉलेजने त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. याविरोधात गुरुवारी विद्यार्थिनींनी आवाज उचलत घोषणाबाजी सुरू केली. आंदोलनाच्या बातम्या प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचू नयेत म्हणून व्यवस्थापनाने कॉलेजचे दरवाजे बंद केले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत विद्यार्थिनींनी आंदोलन सुरूच ठेवल्याने पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाली.

मुलींच्या हॉस्टेलमधील बाथरूममध्ये छुपे कॅमेरे, ३०० व्हिडिओ सापडले; असा उघड झाला भयंकर प्रकार
Mumbai Crime : भयंकर! ७ जणांची हत्या, दोघांचा मृतदेह नाल्यात फेकला; आरोपीच्या दाव्याने पोलिसांची उडाली झोप

असा उघडकीस झाला प्रकार

काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, मुलींच्या बाथरूममध्ये कॅमेरा लपवण्यात कॉलेज तरुणीने विजयला मदत केली. ही मुलगी कोण होती हे पोलीस किंवा कॉलेज प्रशासनाने उघड केलेले नाही. मात्र विजयसोबत एका मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ती आरोपीची मैत्रीण असल्याचा दावा केला जात असून तिनेच कॅमेरा लपवला होता. असं बोललं जात आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com