Amritpal Singh Wife detained : अमृतपालची पत्नी किरणदीप कौरला पोलिसांनी पकडले, देश सोडण्याच्या तयारीत होती

Amritpal Singh Wife detained by Punjab police : खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगची पत्नी किरणदीप कौरला पंजाब पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Amritpal Singh Wife detained by Punjab police
Amritpal Singh Wife detained by Punjab police SAAM TV
Published On

Amritpal Singh Wife detained by Punjab police : खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगची पत्नी किरणदीप कौरला पंजाब पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ती लंडनला जाण्याच्या तयारीत होती. अमृतसर विमानतळावरून तिला ताब्यात घेण्यात आले.

अमृतपाल सिंगबाबत किरणदीपकडे चौकशी केली जात आहे. किरणदीप ही आजच लंडनला जाणार होती. श्री गुरू रामदास आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुपारी दीड वाजताच्या सुमारास लंडनसाठी उड्डाण घेणाऱ्या विमानात ती बसणार होती.

मात्र, त्याआधीच पंजाब पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे. किरणदीपविरुद्ध एकही गुन्हा दाखल नाही. मात्र, तिला नजरकैदेत ठेवण्याची शक्यता आहे.  (Latest Marathi News)

Amritpal Singh Wife detained by Punjab police
Crime News In Pune : संतापजनक! पुण्यात तरुणाची महिलेला मारहाण; थरारक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

अमृतपाल सिंगची पत्नी जालंधरमधील कुलारा येथील रहिवासी आहे. अमृतपालने तिच्यासोबत याचवर्षी १० फेब्रुवारीला लग्न केले होते. किरणदीपचे संपूर्ण कुटुंब काही वर्षांपूर्वीच लंडनला गेले होते. त्यांच्याकडे तेथील नागरिकत्व आहे.

काही दिवसांपूर्वीच पोलीस तपासात किरणदीपचे नाव समोर आले होते. ती खलिस्तान समर्थक संघटना बब्बर खालसाची सक्रिय सदस्य असल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात पोलीस आणि तपास यंत्रणा पुराव्यांचा शोध घेत आहेत.

Amritpal Singh Wife detained by Punjab police
India Corona Update : कोरोनाचा धोका कायम; रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ, 24 तासांत 12,591 नव्या रुग्णांची नोंद

अमृतपाल महिनाभरापासून फरार

अमृतपाल सिंगच्या विरोधात पंजाब पोलिसांनी १८ मार्चला राज्यभरात शोधमोहीम सुरू केली होती. त्याचदरम्यान त्याच्या अनेक साथीदारांना अटक केली होती.

अमृतपाल मागील महिनाभरापासून पसार आहे. अनेक प्रयत्न करूनही तो पंजाब पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याची सर्वात जवळचा साथीदार पप्पालप्रीत सिंगलाही अटक केली आहे. त्याच्या चौकशीतूनही काही धागेदोरे हाती लागलेले नाहीत.

दरम्यान, काही वेळापूर्वी आलेल्या रिपोर्टनुसार किरणदीप कौरला पोलिसांनी ताब्यात घेतलेले नाही, तर विमानतळावरील संबंधित यंत्रणेकडून तिची चौकशी करण्यात येत असल्याचे कळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com