Amit Shah: आज चर्चेला सुरूवात करा, उद्या सर्व प्रश्नांची उत्तरं देईन; अमित शहांचे विरोधकांना ओपन चॅलेंज

Amit Shah On Rahul Gandhi: विद्यार्थी आंदोलनावर चर्चा करण्यासाठी आम्ही तयार आहोत. विरोधकांनी आजपासून चर्चेला सुरूवात करावी मी उद्या उत्तर देईन असं अमित शाह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
Amit Shah: आज चर्चेला सुरूवात करा, उद्या सर्व प्रश्नांची उत्तरं देईन; अमित शहांचे विरोधकांना ओपन चॅलेंज
Amit Shah On Rahul GandhiSaam Tv
Published On
  • विद्यार्थी आंदोलनावर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया

  • नीट पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलनावरून चर्चेला तयार

  • आज चर्चा सुरू करा उद्या सर्व प्रश्नांची उत्तरं देईन असं अमित शाह यांनी सांगितले

  • पावसाळी अधिवेशनात अमित शाह यांचे विरोधकांना ओपन चँलेज

विद्यार्थी आंदोलनावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. यावर चर्चा करून सरकारने उत्तर द्यावे अशी मागणी विरोधकांनी केली होती. पण चर्चेऐवजी सभागृहात विरोधकांकडून गोंधळ घातला जात आहे. यामुळे सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे पार पडत नाही. अशातच पावसाळी अधिवशेनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर येत विरोधकांना ओपन चॅलेंज केले. 'आज चर्चेला सुरूवात करा, उद्या ३ वाजता मी सर्व प्रश्नांची उत्तरं देईन.', असे अमित शहा यांनी सांगितले.

पावसाळी अधिवशेनादरम्यान अमित शहा पहिल्यांदाच माध्यमांसोर आले. त्यांनी सांगितले की, 'विरोधकांनी सभागृहाचे कामकाज चालवून द्यावे. आम्ही विद्यार्थी आंदोलनावर चर्चा करण्यासाठी तयार आहोत. फक्त संसदेचे कामकाज चालू द्या. विरोधकांच्या सर्व प्रश्नांची मी उत्तरं देईन. आज दुपारी ३ वाजता चर्चा सुरू करा, उद्या दुपारी ३ वाजता मी निवेदन देईन. मी त्यांचे सर्व पॉइंटर्स लिहून घेईन आणि त्यांना उद्या सविस्तर उत्तर देईन.'

Amit Shah: आज चर्चेला सुरूवात करा, उद्या सर्व प्रश्नांची उत्तरं देईन; अमित शहांचे विरोधकांना ओपन चॅलेंज
Amit Shah on Article 370 रद्द झाल्यानंतर अमित शाह यांचा राज्यसभेतून विरोधकांवर प्रहार! संपूर्ण भाषण

अमित शहा यांनी विरोधकांना आवाहन केले की, 'सरकार सर्व बाबींवर चर्चा करण्यास तयार आहे. विरोधकांनी संसदेचे कामकाज चालू द्यावे. विरोधकांनी चर्चेसाठी दुपारी २ वाजेपर्यंत अध्यक्षांना पत्र सादर करावे. विरोधी पक्ष संसदेच्या कामकाजात अडथळा आणत आहे. विरोधकांनी ठरवावे की, चर्चा करायची की गोंधळ घालायचा. उद्या प्रशोन्नतराचा तासही रद्द करण्याची आमची तयारी आहे.'

Amit Shah: आज चर्चेला सुरूवात करा, उद्या सर्व प्रश्नांची उत्तरं देईन; अमित शहांचे विरोधकांना ओपन चॅलेंज
Amit Shah : अमित शहांसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं, कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा? खुद्द एकनाथ शिंदेंनी सांगितली इनसाइड स्टोरी

तसंच, 'अधिवेशन सुरू झाल्यापासून आपण नियमितपणे संसदेत उपस्थित राहत असल्याचे अमित शाह यांनी स्पष्ट केले. 'नीट पेपरफुटीवरून झालेल्या विद्यार्थी आंदोलनासंदर्भात सरकारकडे लपवण्यासारखे काहीही नाही आणि कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास सरकार तयार आहे,' असे अमित शाह यांनी स्पष्टपणे सांगितले.

तर, अमित शहा यांनी चर्चेसाठी तयार असल्याचे सांगितल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी अमित शाह यांच्यावर टीका करताना सांगितले की, 'गृहमंत्री फक्त लेक्चर देतात. २० दिवसांपासून अमित शाह गायब होते. लाठीचार्जचे आदेश कुणी दिले? हे देशाला जाणून घ्यायचे आहे. ते त्यांनी सांगावे ',

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com