गृहमंत्री अमित शाहांच्या रॅलीत भाजप नेत्याचा मृत्यू; राजकीय वर्तुळात शोककळा

BJP Worker Rajnish Sehgal Dies: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जालंधर रॅलीदरम्यान भाजप नेते रजनीश सहगल यांची तब्येत अचानक बिघडली. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
Rajnish Sehgal Dies After Falling Ill At Amit Shah's Jalandhar Rally
Rajnish Sehgal Dies After Falling Ill At Amit Shah's Jalandhar Rallysaam tv
Published On: 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जालधरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रॅलीदरम्यान भाजप नेते रजनीश सहगल यांची अचानक तब्येत बिघडली. दुपारच्या सुमारास मोठी गर्दी आणि कडाख्याच्या उन्हामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांना घटनास्थळी तातडीने सावरण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला. रजनीश सहगल हे अमित शाह यांच्या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली. रॅलीच्या मंचावरूनही त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.

अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या वैद्यकीय पथकाला याबाबत माहिती देण्यात आली. वैद्यकीय पथकाने तातडीने घटनास्थळी पोहोचून प्राथमिक उपचार केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने संबंधित कार्यकर्त्याला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, रजनीश सहगल यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन पंजाब आम आदमी पक्षाचे महासचिव दीपक बाली यांनी दुःख व्यक्त केले. यावेळी त्यांनी एलपीयू अर्थात लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमधील विद्यार्थी वादावरही प्रतिक्रिया दिली.

विद्यार्थ्यांशी संबंधित काही मुद्दे कथितरित्या दडपले जात असल्याने तरुणांमध्ये असंतोष वाढत होता, असा दावा दीपक बाली यांनी केला. तरुणांचा हा रोष एकाच वेळी समोर आला आणि त्यातून परिस्थिती हिंसक झाल्याचे त्यांनी म्हटले.

एलपीयू प्रकरणाच्या सीबीआय चौकशीच्या मागणीवर बोलताना बाली यांनी सांगितले की, पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केली असून तपास सुरू आहे. विद्यार्थी आंदोलन करत असताना आणि पोलिस त्यांना रोखण्यासाठी पोहोचले होते, त्यावेळी सीबीआय चौकशीची मागणी का करण्यात आली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आता विद्यार्थी शांत झाल्यानंतर सीबीआय चौकशीची मागणी केली जात असल्याचे त्यांनी म्हटले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com