PM Modi : 'अदानीं'वरून PM मोदींवर अमेरिकी अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांची टीका, स्मृती इराणींचा पलटवार; म्हणाल्या..

George Soros On PM Modi : अमेरिकी अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून खळबळ उडाली आहे.
George Soros on PM Modi, Smriti Irani Reply
George Soros on PM Modi, Smriti Irani ReplySaam Tv

BJP Press Conference: अमेरिकी अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून खळबळ उडाली आहे. भाजपनं पत्रकार परिषद घेत सोरोस यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी हे सोरोस यांच्या निशाण्यावर आहेत, असा आरोप भाजपने केला आहे.

काँग्रेसनेही सोरोस यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे. सोरोससारखे लोक आमची निवडणूक प्रक्रिया निश्चित करू शकत नाही, असं काँग्रेसनं म्हटलं आहे. (Breaking Marathi News)

George Soros on PM Modi, Smriti Irani Reply
Shivsena Vs BJP : 'हुकूमशहा हा तसा डरपोकच'; 'सामना'तून मोदी सरकारवर हल्लाबोल

अदानी समूहाच्या मुद्द्यावरून अमेरिकी अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. अदानीच्या मुद्द्यावरून भारतात लोकशाही परिवर्तन घडून येईल, असं ते म्हणाले होते. दरम्यान, सोरोस यांची मोदींवर टीका करण्याची पहिलीच वेळ नाही. याआधीही सन २०२० मध्ये सोरोस म्हणाले होते की, मोदींच्या नेतृत्वात भारत हुकूमशाही व्यवस्थेकडे जात आहे.

George Soros on PM Modi, Smriti Irani Reply
Video : अदानी वादावरून राहुल गांधी यांचा नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल; व्हिडिओ पाहाच

काय म्हणाले होते जॉर्ज सोरोस?

म्युनिख सेक्युरिटी कॉन्फरन्समध्ये जॉर्ज सोरोस म्हणाले होते की, 'भारतातील प्रकरण इंटरेस्टिंग आहे. भारत लोकशाही देश आहे. मात्र, नरेंद्र मोदी हे लोकशाहीवादी नाहीत. भारत 'क्वाड'चा सदस्य आहे, त्यात ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि जपान सुद्धा आहे. मात्र, तरीही भारत रशियाकडून मोठी सवलत घेऊन तेल खरेदी करत आहे आणि नफा कमावत आहे.'

हिंडनबर्ग रिसर्चच्या दाव्यानंतर गौतम अदानींच्या साम्राज्यात मोठी उलथापालथ होत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळीत झाला आहे. मोदी आणि अदानी एकमेकांचे सहकारी आहेत. अदानींनी भांडवली बाजारातून निधी वाढवण्याचा प्रयत्न केला, पण ते अपयशी ठरले. भांडवली बाजारांतील नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. मोदी यावर काहीही बोलत नाहीत, पण विदेशी गुंतवणूकदार आणि संसदेत उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे त्यांना द्यावी लागतील, असेही जॉर्ज सोरोस म्हणाले होते.

अदानी प्रकरण भारत सरकारवरील मोदींची पकड कमकुवत करेल आणि अत्यंत आवश्यक असलेल्या संस्थागत सुधारणांचे द्वार खुले होतील. भारतात मोठा बदल घडून येईल, असे जॉर्ज सोरोस म्हणाले होते.

स्मृती इराणींनी दिलं जोरदार प्रत्युत्तर

केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणींनी जॉर्ज सोरोस यांनी केलेल्या टिप्पणीवर जोरदार पलटवार केला आहे. विदेशातून भारतीय लोकशाही व्यवस्था डळमळीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जॉर्ज सोरोस यांनी भारतीय लोकशाहीत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला आहे आणि पंतप्रधान मोदी त्यांच्या निशाण्यावर आहेत, असा आरोप इराणी यांनी केला.

नापाक योजना यशस्वी करण्यासाठी त्यांच्या आवश्यकतेनुसार काम करणारे सरकार जॉर्ज सोरोस यांना हवे आहे. त्यांच्या वक्तव्यावरून हे स्पष्ट होते की, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसारख्या नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी एक अब्ज डॉलरपेक्षा अधिकच्या फंडिंगची घोषणा केली आहे, असा आरोपही इराणींनी केला.

काँग्रेसनंही जॉर्ज सोरोसना सुनावलं

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनीही या मुद्द्यावरून जॉर्ज सोरोस यांना फटकारलं आहे. अदानी समूह प्रकरणामुळे भारतात लोकशाही परिवर्तनाला सुरुवात झाली की नाही हा पूर्णपणे काँग्रेस, विरोधक आणि आमच्या निवडणूक प्रक्रियेवर अवलंबून आहे. जॉर्ज सोरोसना त्याच्याशी काहीही देणं-घेणं नाही, असं रमेश म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com