Shivsena Vs BJP : 'हुकूमशहा हा तसा डरपोकच'; 'सामना'तून मोदी सरकारवर हल्लाबोल

Saamana On Narendra Modi: शिवसेना ठाकरे गटाने मुखपत्र 'सामना'तून राहुल गांधी यांना लोकसभा सचिवालयाने हक्कभंग नोटीस बजावण्यावरून मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
Narendra Modi - Uddhav Thackeray
Narendra Modi - Uddhav Thackeray Saam Tv
Published On

Mumbai News : शिवसेना ठाकरे गटाने मुखपत्र 'सामना'तून राहुल गांधी यांना लोकसभा सचिवालयाने हक्कभंग नोटीस बजावण्यावरून मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.' मोदी सरकारने प्रश्नकर्त्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. यालाच हुकूमशाही म्हणतात. हा डरपोकपणासुद्धा आहेच. हुकूमशहा हा तसा डरपोकच असतो, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाने मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. (Latest Marathi News)

लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना हक्कभंग नोटीस बजावल्यानंतर राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. काँग्रेसनेही मोदी सरकारवर जोरदार टीका केली. त्यानंतर आज शिवसेना ठाकरे गटाच्या 'सामना' मुखपत्रातील अग्रलेखातून मोदी सरकारवर हल्लाबोल करण्यात आला आहे.

Narendra Modi - Uddhav Thackeray
Pune Crime News: पुण्यात चाललंय काय? कोयता गँगचा काँग्रेसच्या बड्या नेत्यावर जीवघेणा हल्ला, थोडक्यात जीव वाचला

'सामना'च्या अग्रलेखात लिहिले आहे की, 'लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांना नोटीस पाठवली असून 15 फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. राहुल यांनी 7 फेब्रुवारी रोजी लोकसभेत केलेल्या भाषणाने भाजपचा चेहरा संसदेत पिवळा पडला होता. या भाषणात राहुल गांधी यांनी जे प्रश्न उद्योगपती अदानी-मोदी संबंधांबाबत निर्माण केले, त्यावर उत्तर देण्याचे टाळून पंतप्रधान मोदी फक्त ‘इधर उधर की बाते’ करीत राहिले'.

'राहुल गांधी यांनी मोदी सरकारची बोटेच छाटली'

'गेली सात-आठ वर्षे राहुल गांधी हे भाजपच्या खिजगणतीत नव्हते. आता त्यांनी ‘राहुल’नामाचा धसकाच घेतला आहे. 7 फेब्रुवारीच्या भाषणात राहुल गांधी यांनी मोदी सरकारची बोटेच छाटली व ते दुखरे हात तोंडावर ठेवून भाजपवाले बोंबा मारीत आहेत. मुळात ‘अदानी-मोदी’ प्रकरणात देशाची नाचक्कीच झाली आहे, पण भाजप त्याबाबत डोळ्यावरपट्टी व तोंडावर बोट ठेवून आहे, अशी टीका 'सामना'तून भाजपवर करण्यात आली.

Narendra Modi - Uddhav Thackeray
Aaditya Thackeray: देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले जे सत्य आहे ते...

'हुकूमशहा हा तसा डरपोकच'

'मोदी हे हजरजबाबी आहेत. मोठमोठ्या सभा, आंतरराष्ट्रीय मंच ते गाजवून सोडतात. मग स्वतःच्या लोकसभेत अत्यंत किरकोळ वाटणाऱ्या राहुल गांधींच्या प्रश्नांना ते उत्तर का देऊ शकले नाहीत? आणि आता प्रश्नकर्त्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. यालाच हुकूमशाही म्हणतात. हा डरपोकपणासुद्धा आहेच. हुकूमशहा हा तसा डरपोकच असतो, अशी टीका देखील 'सामना'तून करण्यात आली.

Narendra Modi - Uddhav Thackeray
Maharashtra Politics : ठाकरे की शिंदे? शिवसेनेवर हक्क कुणाचा? राज्यातील सत्तासंघर्षावर आज 'सुप्रीम' सुनावणी

'अदानी यांनी गेल्या 20 वर्षांत इलेक्टोरल बॉण्डच्या मार्फत भाजपला किती पैसे दिले?’’ हा हिशेब मागताच भाजपवाल्यांची तोंडे पाहण्यासारखी झाली, अशी टीका 'सामना'तून अदानी वादावरून करण्यात आली.

'आपण एकटे विरोधकांना भारी पडलो आहोत असे पंतप्रधान गरजले, पण प्रत्यक्षात एकटे राहुल गांधी 7 फेब्रुवारी रोजी मोदी व त्यांच्या सरकारला भारी पडले हे आता स्पष्ट झाले. राहुल गांधी यांनी मैदान मारले व भाजपने रडीचा डाव खेळत राहुल गांधींना (Rahul Gandhi) नोटीस बजावली. याला पलायनवाद म्हणतात. पाकिस्तानसमोर डरकाळ्या फोडायच्या व लडाखमध्ये घुसलेल्या चीनचे नावही घ्यायचे नाही, त्यातलाच हा प्रकार, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांच्यावर करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com