

अमेरिकेच्या नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डने (NTSB) ४ नोव्हेंबर रोजी केंटकी राज्यात झालेल्या UPS कार्गो विमान अपघाताचा भयानक व्हिडिओ जारी केला आहे. लुईसव्हिल येथून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच कार्गो विमान कोसळले. या भीषण दुर्घटनेत १४ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. तर, २३ जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघाताशी संबंधित व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
केंटकी विमान अपघाताच्या नवीन व्हिडिओमध्ये बोईंग इंजिनला टेकऑफदरम्यान, आग लागल्याचे दिसून आले आहे. ४ नोव्हेंबर रोजी झालेल्या अपघातात एमडी -११ जेट धावपट्टीवर तुकडे पडल्याचे दिसून आले. या अपघाताचे व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
केंटकी विमान अपघातात १४ जणांचा मृत्यू
नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डने प्रसिद्ध केलेल्या प्राथमिक तपास अहवालानुसार, इंजिनला आधार देणाऱ्या पाइलनमध्ये फटीक क्रॅक्स आणि ओव्हर स्ट्रेसचे चिन्हे आढळले आहेत. इंजिनचा आधार कमकुवत झाल्यानं अचानक स्फोट झाल्याची शक्यता तपासली जात आहे. अपघाताच्यावेळी विमान जमिनीपासून अवघे ३० फूट उंचीवर होते.
उड्डाण घेतल्यानंतर त्या विमानाचा काही भाग युपीएस वेअरहाऊसच्या छतावर आदळले. मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान १९९१ साली बांधण्यात आले होते. अलीकडेच त्याची देखभाल करण्यात आली होती. युपीएस फ्लाइट २९७६ च्या टेकऑफ शेवटच्या क्षणी इंजिनचा स्फोट झाला. यामुळे हा अपघात घडल्याची माहिती आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.