Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात २५ नवे कोरोना रुग्ण, मुंबईत ८ रुग्णांची नोंद

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज मंगळवार, दिनांक २४ जून २०२५, इराण आणि इस्रायलमध्ये पूर्ण युद्धबंदी, आषाढी वारी, महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, मुंबईला पुढील चार दिवस पावसाचा इशारा, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, कोरोना अपडेट अपडेटसह मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

महाराष्ट्रात २५ नवे कोरोना रुग्ण, मुंबईत ८ रुग्णांची नोंद

महाराष्ट्रात कोरोनानं हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.

राज्यात आज मंगळवारी २५ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

त्यातील आठ रुग्ण हे मुंबईतील आहेत.

सार्वजनिक आरोग्य विभागानं दिली माहिती

राज्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या २५६ वर पोहोचली

जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत एकूण २३९५ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ८६.११ टक्के

सेवाग्राम, पवनार वगळता सगळीकडे दारू खुली करा- - खासदार अमर काळे

वर्धा जिल्ह्यात 1974 पासून दारूबंदी आहेय.मात्र ही दारूबंदी केवळ कागदावरच आहे. जिल्ह्यात लहान मुले सुद्धा दारूच्या व्यसनधीन होत आहे. मोठया प्रमाणात विषारी दारू सुद्धा जिल्ह्यात येत आहे. यामुळे ऐतिहासिक वारसा असलेल्या सेवाग्राम व पवनार आश्रमच परिसर वगळता शासनाने दारूबंदी हटवावी. शासनाने तसा प्रस्ताव ठेवल्यास आमचा विरोध असणार नाहीय असे मत वर्धेचे शरद पवार गटाचे खासदार अमर काळे यांनी व्यक्त केलंय.

कोल्हापूर, सांगली संभाव्य पूरस्थिती हाताळण्यासाठी राज्य सरकारच पाऊल

नाशिक 6 वर्षीय मुलीचा खून करून पोलीस कर्मचाऱ्यांची आत्महत्या...

नाशिक 6 वर्षीय मुलीचा खून करून पोलीस कर्मचाऱ्यांची आत्महत्या...

नाशिक रोड परिसरातील जेलरोड येथील घटना...

स्वप्निल गायकवाड व 34 यांनी आपल्या सहा वर्षाची मुलगी भैरवीला गडपास देत तिचा खून करून घेत स्वतः केली आत्महत्या...

स्वप्निल गायकवाड हा उपनगर पोलीस ठाण्यात होता कार्यरत

सांगली महापालिकेकडून पूरप्रवन भागात सुरक्षा जनजागृती सुरु

सांगली महापालिकेकडून पूरप्रवन भागात सुरक्षा जनजागृती सुरु

अग्निशमन आणि आणीबाणी सेवा विभागाच्या जवानांकडून पूर पट्ट्यातील नागरिकांमध्ये जनजागृती

पूर परिस्थिती उद्भवल्यास काय काळजी ग्यावी याबाबत दिले प्रशिक्षण

तोतया सीबीआय अधिकारीचा कारनामा, बांधकाम व्यावसायिकाला दिली अटकेची धमकी

बोरिवली (पूर्व) येथील एका बिल्डरच्या घरात चार जणांनी स्वतःला सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून जबरदस्तीने घुसून त्यांना धमकावले आणि पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी समीर नावाच्या आरोपीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील एक आरोपी समीर वर्तक हा काँग्रेसचा कार्यकर्ता असून गुन्हा दाखल होताच काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांनी त्याची तात्काळ पक्षातून हकालपट्टी केली. कस्तुरबा मार्ग पोलिसांनी विकासाच्या सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला असून इतर आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

खेड आणि शिरुर तालुक्यासाठी वरदान ठरणारे आरळा नदीवरील कळमोडी धरण ओव्हरफ्लो

सह्याद्रीच्या कुशीत भिमाशंकर परिसरात गेल्या आठ दिवसांपासुन पाऊसाची संततधार सुरु असल्याने आरळा नदीवर असणारे कळमोडी धरण पुर्ण क्षमतेने भरले असुन धरणातुन आरळा नदीतुन चासकमान धरणात 2 हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आलाय..!भिमाशंकर च्या परिसरात पाऊसाची संततधार अशीच सुरु राहिल्यास चासकमान धरणाची पाणी पातळीही झपाट्याने वाढणार आहे त्यामुळे प्रशासनाकडुन नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून बच्चू कडू यांना दिलासा

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर उपाध्यक्ष अभिजीत ढेपे यांच्या नेतृत्वात संचालक व प्रहार कार्यकर्त्यांनी फटाके फोडत एकमेकांना लाडू भरवत जल्लोष साजरा करत आनंद साजरा केला..अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत बच्चू कडू यांना विभागीय सहनिबंधक यांनी अध्यक्ष व संचालक पदावरून अपात्र केल होतं,या विरोधात बच्चू कडू यांनी नागपूर हायकोर्टत धाव घेतली होती तर आज विभागीय सहनिबंधकाच्या निर्णयाला नागपूर हायकोर्टाने स्थगिती दिली,त्यामुळे अमरावती जिल्हा बँकेत बच्चू कडू यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बच्चू कडू यांचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष व संचालक पद कायम असल्यामुळे अमरावतीत जिल्हा बँक उपाध्यक्ष,संचालक व प्रहार कार्यकर्त्यांचा जल्लोष व्यक्त केला व फटाके फोडत एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा केला, नाशिक येथील एका गुन्ह्यात बच्चू कडू यांना एक वर्षाची शिक्षा झाल्याने बच्चू कडू यांना अमरावतीच्या विभागीय सहनिबंधकाने संचालक आणि अध्यक्षपदावरून अपात्र केलं होतं, मात्र नागपूर हायकोर्टाने बच्चू कडू यांना दिलासा दिला

माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक; अजित पवार गटाचे तीनही उमेदवार आघाडीवर

माळेगाव गटातून अजित पवार गटाचे तीनही उमेदवार आघाडीवर.

सर्वसाधारण ऊस उत्पादक गट

पहिल्या गटात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे तिन्ही उमेदवार आघाडीवर

रंजीत जाधवराव यांना 396 मत तर तावरे गटाचे उमेदवार गजानन काटे यांना 250 मत रंजीत जाधवराव 146 मतांनी पुढे आहेत.

बाळासाहेब तावरे 366 मत तावरे गटाचे यांचे रंजन काका तावरे यांना 313 मत बाळासाहेब तावरे 53 मतांनी आघाडीवर आहेत.

राजेंद्र बुरुंगले यांना 321 मत तावरे गटाचे रमेश गोफणे यांना 197 मत राजेंद्र बुरुंगले 124 मतांनी पुढे आहेत.

छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेकडून अतिक्रमण मोहीम सुरू

छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेकडून अतिक्रमण मोहीम सुरू आहे ही अतिक्रमण मोहीम थांबावी यासाठी काही नागरिकांनी कोर्टात याचिका दाखल केली होती, मात्र नागरिकांची ही याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. 25 जून सूर्यास्तापर्यंत शहरात जिथे जिथे पत्रे टाकून जागा अतिक्रमण करण्यात आली आहे. ते पत्रे नागरिकांनी तोडून टाकावे, असं हायकोर्टांना सांगितलेले आहे, अन्यथा महापालिके कुठलीही नोटीस न देता कारवाई करेल असेही कोर्टाने स्पष्ट केलाय तर ज्यांची पक्की बांधकाम आहे. त्या सगळ्यांना तीस दिवसांत शपथपत्र दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

पुण्यात पालखी सोहळ्यादरम्यान चोरीच्या घटना, २३ लाखांचा मुद्देमाल जप्त

वारकऱ्यांचे मोबाईल आणि महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून चोरी करणाऱ्या आंतरराज्य व परजिल्ह्यातील टोळीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक

चोरीचे सहा गुन्हे उघड

हडपसर, वानवडी, लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले आहेत

गर्दीचा फायदा घेऊन केल्या चोऱ्या

पुण्यातील अल्पवयीन मुलीने दिल्लीत आपलं आयुष्य संपवलं

पुण्यातील उच्चभ्रू कुटुंबातील चिमुरड्याचा सांभाळ करण्यासाठी ठेवलेल्या मुलीनं केली आत्महत्या

गरीब घरातील अल्पवयीन तरुणीच्या आत्महत्येनं एकच खळबळ

लहान मुलाचा सांभाळ करण्यासाठी कुटुंबीय आत्महत्या केलेल्या तरुणीला दिल्ली येथे घेऊन गेले होते

बोरिवली पूर्वमधील देवीपाडाजवळ खासगी बसला भीषण आग

बोरीवली पूर्वमधील देवीपाडाजवळ खासगी बसला भीषण आग

अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल

परिसरात भीतीचं वातावरण

सुदैवाने कोणतीही जिवीतहानी नाही

इस्राइल-इराणनंही शस्त्रसंधी उल्लंघन केलंय - ट्रम्प

इस्राइल आणि इराण या दोन देशांमध्ये युद्ध सुरू आहे. दोन्हींकडून हल्ले केले जात आहेत. यात आता अमेरिकेसारख्या बलाढ्य देशानंही उडी घेतली आहे. दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली होती. मात्र, तरीही हल्ले सुरूच आहेत. यावर इस्राइल आणि इराणनंही शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे, अशा शब्दांत डोनाल्ड ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नाशिक : गोदावरीच्या पाणीपातळीत घट, गंगापूर धरणातून विसर्ग केला कमी

गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग घटवला

६,१६० क्यूसेकवरून पाण्याचा विसर्ग ४,४०० क्यूसेकपर्यंत कमी केला

नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणीपातळीत घट

गोदावरीच्या पाणीपातळीत घट; मात्र रामकुंड गोदा घाट परिसरात पूरस्थिती कायम

'हिंदी सक्ती'विरोधात चारकोपमध्ये मनसेची स्वाक्षरी मोहीम

नवीन शैक्षणिक धोरणानुसार शाळांमध्ये केलेल्या हिंदी सक्तीच्या विरोधात मनसेचे आंदोलन तीव्र झाले आहे. आज चारकोप येथील ऑक्सफर्ड शाळेजवळ मनसेतर्फे स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. शेकडो पालकांनी सहभाग घेत हिंदी सक्तीला विरोध दर्शवला. यावेळी मनसेचे कुणाल माईनकर यांनी या निर्णयावर टीका केली. संदीप देशपांडेंनी षंढ शब्द वापरला म्हणून गदारोळ झाला, पण २८८ आमदारांपैकी एकाही आमदाराने हिंदी सक्तीचा मुद्दा उचलला नाही, असे ते म्हणाले.

अभिनेता आमिर खाननं घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट

अभिनेता आणि चित्रपट निर्माता आमिर खान यानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. राष्ट्रपती भवनमध्ये ही भेट झाली.

रत्नागिरी - दापोलीतील पाजपंढरी गावाला समुद्राचा धोका

समुद्रातील मोठ्या उधाणामुळे परिसरातील घरांत शिरले पाणी

घरातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान

समुद्रकिनाऱ्यावरील 40 ते 50 घरांना उधाणाचा धोका

समुद्रकिनारी लोकांनी रात्र जागून काढली

सूर्या नदीत वाहून गेलेली खाजगी बोट एनडीआरएफने सुरक्षितपणे बाहेर काढली

सूर्या नदीवरील मासवण येथील उड्डाणपुलाला अडकलेली खाजगी हाऊस बोट अखेर एनडीआरएफच्या पथकाने सुस्थितीत बाहेर काढली आहे. जोरदार पावसामुळे नदीचा प्रवाह वाढल्याने ही बोट वाहत जाऊन थेट मासवण येथील उड्डाणपुलाला धडकली होती.

ही घटना घडल्यावर प्रशासनाने तात्काळ राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाला (NDRF) पाचारण केलं. आज दुपारी विशेष रेस्क्यू ऑपरेशन राबवून ही बोट सुरक्षितरित्या पुलाखालून बाहेर काढण्यात आली.

Surat: सुरतमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत...

पावसामुळे पोलिस स्टेशनही पाण्याखाली गेले...

सुरतमधील सरथाना पोलिस स्टेशनमध्ये पाणी शिरले...

पोलिस स्टेशनमध्येही पाणी शिरले...

पोलिस लॉकअपमध्येही पाणी शिरले...

कर्ली नदीत वाहून गेलेल्या तरुणाचाएनडीआरएफ पथकाकडून शोध सुरू

कुडाळ माणगाव खोऱ्यातील वसोली पुलावरून वाहून गेलेल्या तरुणाचा एनडीआरएफच्या पथकाकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

माणगावमधून शिवापूरला जात असताना कॉजवेवर आलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वार वाहून गेल्याचे घटना काल रात्री घडली होती. त्या दुचाकीस्वाराचा शोध एनडीआरफच्या पथकाकडून नदीपात्रात शोध सुरू असून कुडाळ पोलिसांची टीम सुद्धा उपस्थित आहे.

Pune: पुण्यात मार्केटयार्ड जवळील गंगाधाम चौकात जड वाहनांना 24 तास बंदी

गंगाधाम चौकात ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकी वर असलेल्या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर वाहतूक विभागाने या ठिकाणी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

कान्हा हॉटेल ते गंगाधाम चौक दरम्यानच्या रस्त्यावर ट्रक,मिक्सर,डंपर कंटेनर व इतर सर्व जड,अवजड वाहनास वाहतुकीसाठी येण्यास 24 तास बंदी घालण्यात आली आहे

सुरतच्या प्राइम मार्केटजवळ पाणी साचल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान...

सुरत शहरातील अनेक दुकान पाण्याखाली...

पावसाचे पाणी साचल्याने तळघरातील अनेक दुकानांचे मोठे नुकसान.....

शहरातील वरसादेवी राम येथील दुकानातील कर्मचारी मोटार आणि कॅन वापरून पाणी काढत असल्याची परिस्थिती....

Santosh Deshmukh: संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी सात जुलैला होणार

बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणाची पुढील सुनावणी जुलै महिन्यात होणार

बीड न्यायालयात तीन तास चालला युक्तिवाद.

दोष मुक्ती चार्जावरती दोन्ही वकिलांचा युक्तिवाद.

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi: संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात बैल उधळला

दोन दिवसांपूर्वी दिवे घाटातून माऊलींची पालखी विसावाच्या ठिकाणी एक बैल गर्दीमुळे उधळला…

बैल उधळल्यामुळे वारकरी आणि नागरिकांची धावपळ…

दिवे घाट सर करण्यासाठी माउलींच्या रथाला चार ते पाच बैल जोड्या होत्या….

या घटनेत कुणीही जखमी झाले नसल्याची माहिती

संत ज्ञानेश्वर माउलींची पालखी आज कुलदैवत खंडोबाच्या जेजुरीत

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबाच्या सोन्याच्या जेजुरीत दाखल होणार आहे. आज पहाटेपासूनच लाखो वारकरी खंडोबाच्या दर्शनासाठी गडावर जमले आहेत…शैव आणि वैष्णव परंपरेचा हा अनोखा संगम आज जेजुरीत खंडोबा गडावर होतोय…ड्रोन कॅमेऱ्यातून पाहूया खंडोबा गडाची ही खास दृश्यं...वारकऱ्यांची मांदियाळी, फड, अभंग, टाळ मृदुंगाचा गजर... आणि त्या भक्तीमय वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी खंडोबाच्या सोन्याच्या जेजुरी नगरीत दाखल होणार आहे…खंडोबा गडावरचा लाखो वारकऱ्यांचा आजचा नजारा म्हणजे वारी परंपरेचा एक अध्याय.

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा भंडारा दौरा तीन दिवस पुढे ढकलला...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या भंडारा इथं आभार दौऱ्यासाठी होते. मात्र, हवामान विभागानं उद्या भंडारा जिल्ह्यात पावसाचा जोरदार अंदाज वर्तविला असल्यानं उपमुख्यमंत्री शिदेंचा उद्याचा नियोजित दौरा रद्द करण्यात आला आहे. आता एकनाथ शिंदे हे तीन दिवसानंतर २८ जूनला भंडारा इथं येणार आहेत.

Bhiwandi: भिवंडीत मुसळधार पावसामुळे गायत्री नगर परिसरात दरड कोसळली

दरड कोसळल्याने 5 ते 6 घरांचे नुकसान , काही घर ढिगाऱ्याखाली दबली

या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी किंवा जखमी नाही

डोंगराळ भागात शेकडो झोपडपट्ट्यांना महापालिकेच्या वतीने देण्यात आली होती .

सध्या येथील रहिवाशांना महापालिकेच्या शाळेत राहण्याची सोय करण्यात आले आहे

Solapur: दक्षिण सोलापूर तालुक्यात डंपरने दुचाकीला दिली धडक, दुचाकी वरील तिघेजण ठार..

- धोत्री गावातून कामाकडे जात असताना बांधकाम कामगारांचा अपघातात मृत्यू..

- धोत्री ते मुस्ती मार्गे जाणाऱ्या रस्त्यावर घडला विचित्र अपघात

- अनोळखी डंपरने धडक दिल्याने गावात राहणाऱ्या तिघांचा दुर्दैवी मृत्यू

- पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे

Malegaon: माळेगाव कारखाना पंचवार्षिक निवडणूकीत अजित पवार गटाची आघाडी

अजित पवार गटाचे नीलकंठेश्वर पॅनलचे रतनकुमार भोसले आघाडीवर

तावरे गटाचे सहकार बचाव पॅनलचे बाबुराव गायकवाड पिछाडीवर

अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग गटामधून रतनकुमार भोसले आघाडीवर

जेजुरी गडावर खंडेरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची गर्दी...

संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आज खंडेरायाच्या जेजुरी नगरीमध्ये दाखल होत आहे आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम जेजुरी नगरीत आहे सकाळपासूनच अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर खंडेरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांनी गर्दी केली आहे आज पालखी जेजुरी दाखल होत असल्याने जेजुरी गडावर आकर्षक अशी फुलाची सजावट करण्यात आली आहे

धाराशिव जिल्ह्यातील वाणेवाडी येथे शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकरी पुन्हा एकवटले

तुळजापूर तालुक्यातील वानेवाडी येथे मोजणीसाठी आलेल्या पोलिस बंदोबस्तासह आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी अडवले

शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध असून मोजणी करू न देण्याची शेतकऱ्यांची भूमिका

धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन केला विरोध

Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस

पंचगंगा नदीच पाणी पात्र बाहेर

पंचगंगा नदी पातळी 29 फूट एक इंचावर

धरण क्षेत्रात सुरू आहे मुसळधार पाऊस

Mumbai: मुंबईच्या समुद्रात हाय टाईड

सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास समुद्रात उसळल्या उंचच उंच लाटा

आज पासून पुढील पाच दिवस असणार मुंबईच्या समुद्रात हाईटाइड

समुद्रकिनारी न जाण्याचे मुंबई महानगरपालिकेचे मुंबईकरांना आवाहन

आज सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर उसळल्या 4.59 मीटर उंचीच्या लाटा

Nashik: नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या धरणांमधील आजचा पाणीसाठा

- गंगापूर धरण - ६१.३७ टक्के

- दारणा धरण - ५७.२२ टक्के

- मुकणे धरण - ४८.८३ टक्के

- चणकापूर धरण - ४०.८३ टक्के

- पालखेड धरण - ७३.६६ टक्के

- कडवा धरण - ४६.३७ टक्के

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सुनावणीला प्रत्यक्षात सुरुवात

सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील उज्वल निकम न्यायालयात उपस्थित

सोबत सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे.

तपासी अधिकारी सीआयडी च्या अप्पर पोलीस अधीक्षक किरण पाटील व डी वाय एस पी अनिल गुजर न्यायालयात उपस्थित.

आरोपी यांना सुरक्षेच्या कारणास्तव न्यायालयात व्हीसीद्वारे हजर.

सातपुड्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेती गेली वाहून....

अक्राणी तालुक्यातील केलापाणी गावात शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या भात शेती वाहून गेली...

पेरणी केलेली भात शेती पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने शेतकऱ्याचं नुकसान.....

केलापाणी गावातील शेतकरी खुमान वसावे यांची भात शेती वाहून गेल्याने मोठ नुकसान....

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे डोंगरदर्‍यांना पूर परिस्थिती.....

मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचल्याने पेरणी केलेली पिके खराब होण्याच्या मार्गावर शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट.....

Nashik: रामकुंडावरील धार्मिक विधींना गोदावरीच्या पुराचा फटका

- रामकुंडावर दशक्रिया विधीसह अस्थि विसर्जन आणि अन्य धार्मिक विधींना मोठे महत्त्व

- मात्र गोदावरीच्या पुरामुळे हा सगळा परिसर पुराच्या पाण्याखाली गेल्याने रस्त्यावर धार्मिक विधी करण्याची भाविकांवर वेळ

- दररोज देशभरातून हजारो भाविक या धार्मिक विधींसाठी रामकुंडावर येतात

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज यलो अलर्ट

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज यलो अलर्ट देण्यात आला असून सकाळपासून अधूनमधून पावसाच्या दमदार सरी कोसळत आहेत रात्री पासून जिल्ह्यातील कणकवली, वैभववाडी तालुक्यात पावसाचा जोर पाहायला मिळाला. रात्रभर झालेल्या पावसामुळे कणकवलीतील गडनदी, कुडाळमधील भंगसाळ व सावंतवाडीतील तेरेखोल या प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. दरम्यान सकाळपासून जोरदार वा-यासह अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत तर गेल्या 24 तासात जिल्ह्यात 44.62 मिमी पासून झाला असून वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 87 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

जायकवाडी धरणामध्ये पंधरवड्यात पाच टक्के पाण्याची वाढ

मराठवाड्यातील जायकवाडी धरणामध्ये पंधरवड्यात पाच टक्के पाण्याची वाढ झाली आहे. सध्या धरणात 11 हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. गेल्या आठवड्यापासून नाशिक आणि नगर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे गोदावरी नदीपात्रातून जायकवाडीमध्ये पाण्याची आवक वाढली होती. त्यासोबतच जायकवाडी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस होत असल्याने जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. सध्या धरणात 34.94% एवढा पाणीसाठा आहे. गोदावरी नदीपात्रातून येणाऱ्या पाण्याची आवक हळूहळू वाढू लागली आहे. त्यामुळं धरणाच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ होईल अशी स्थिती आहे.

सातपुड्याचा नैसर्गिक सौंदर्य खुलल..

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सातपुड्याचा नैसर्गिक सौंदर्य खुलल...

मुसळधार पावसानंतर चांदशैली घाटात पसरली धुक्याची चादर....

सातपुडा पर्वत रांगेने नटला हिरवा शालू....

नंदूरबार जिल्ह्यातील चांदसैली घाटात पसरली दाट धोक्याची पसरली चादर...

सूर्या नदीत अडकलेली बोट बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफची कारवाई सुरू

पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाने उसंत घेतली आहे. सकाळपासून अधूनमधून हलक्या सरी पडत असल्या तरी, आकाशावर दाट ढगांचे आच्छादन कायम आहे. दरम्यान, सूर्या नदीच्या पाण्यात मासवण परिसरात अडकलेली बंद हाऊस बोट बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाने घटनास्थळी हजेरी लावली असून बोट बाहेर काढण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

ज्ञानोबांची पालखी आज जेजुरीत पोहचणार

ज्ञानोबांची पालखी आज खंडेरायच्या जेजुरीत पोहोचणार आहे. या निमित्ताने आज सकाळपासून मोठ्या संख्येने वारकरी जेजुरी मध्ये दाखल झाले आहेत. जेजुरीच्या वेशीवर वारकऱ्यांना भंडारा लावून स्वागत केलं जात आहे. जेजुरीत पालखी आल्यावर भंडाऱ्याची उधळण करून माऊलींचं स्वागत करण्यात येतं. संपूर्ण जेजुरी नगरी भंडाऱ्यासह वारकऱ्यामुळे अक्षरशः फुलून गेलीय

नाशिकच्या दर्गा दंगल प्रकरणात लवकरच १२०० पानांचे दोषारोपपत्र होणार न्यायालयात दाखल

- तपास पूर्ण करत मुंबईनाका पोलिसांनी केले ४५ आरोपी निश्चित

- १५ एप्रिलला काठे गल्लीतील अनधिकृत दर्गा हटवण्याप्रकरणी २७ साक्षीदारांचे जबाब

- कारवाई दरम्यान जमावाने पोलिसांवर दगडफेक करत घडवली होती दंगल, यात २१ पोलिस झाले होते जखमी

- दंगल पूर्वनियोजित असल्याचे झाले होते उघड

- टिप्पर गँगचा शाकीर पठाण दंगलीचा मास्टरमाइंड फरार, तर आमिन बोरसेला अटक

Maharashtra Live News Update: नागपूरसह विदर्भात आजपासून पुढील चार दिवस मध्यम ते मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा

- सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरणात अधून मधून पावसाच्या हलक्या सरी काही भागांमध्ये पडल्यात...

- वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे

- जून महिन्याचे चोवीस दिवस उलटूनही अजूनही नागपुरात मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे...

- दक्षिण-पश्चिम मान्सून मध्य भारतात पुढे सरकल्याने नागपूरचा विदर्भात पुढील चार दिवसात पावसाचा हवामान जगाचा अंदाज.

बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्याची आज मतमोजणी

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी सकाळी नऊ वाजता सुरू होईल मात्र या ठिकाणी पोलिसांचा कडे कोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. उपमुख्यमंत्री स्वतः या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत यामुळे या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागलेला आहे. बारामतीतील प्रशासकीय भवनात ही मतमोजणी होणार आहे.

लातूर मनपा आयुक्त मीना ऍक्टिव्ह मोडवर, शहरातील अतिक्रमणावर पोलीस बंदोबस्तात कारवाई

लातूर शहरातील रस्त्यांवर अतिक्रमण वाढत चालल्याने. महानगरपालिकेने अतिक्रमणावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे, शहरातील गांधी चौक ते गंजगोलाईपर्यंत फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम लातूर मनपाच्या अतिक्रमण विभागाने पोलिस बंदोबस्तात राबविली जात आहे. तर काल पासून 40 अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. महात्मा गांधी चौकापासून गंजगोलाईच्या दिशेने मेनरोडवर झालेले अतिक्रमण आज देखील हटविण्यात येणार आहे.

फुटपाथ वरील टपऱ्या, दुकान रोडवर आलेले शेड हटविण्यात आल्याने शहरात वाहतूक देखील सुरळीत होणार आहे.

जालना जिल्ह्यात आतापर्यंत अडीच लाख हेक्टरवर खरीप हंगामातील पेरणी पूर्ण

जालना जिल्ह्यात आतापर्यंत अडीच लाख हेक्टरवर खरीप हंगामातील पेरणी पूर्ण झालीय. जिल्ह्यात यंदा 6 लाख हेक्टरवर खरीप पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत अडीच लाख हेक्टरवर खरीप पेरणी पूर्ण झाली आहे. यंदा पावसाला लवकर सुरुवात झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदा लवकर पेरण्या केल्या. या हंगामात कापूस, मका, सोयाबीन या पिकांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल पाहायला मिळत आहे. दरम्यान, जिल्ह्यात खते आणि बियाण्यांचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून बोगस खते आणि बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही या दृष्टीने कृषी विभाग लक्ष ठेवून आहे.

मोकाट जनावरांच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू, एक जण जखमी

- नाशिकच्या कळवण शहरातील धक्कादायक घटना

- भर रस्त्यात दोन मोकाट जनावरांच्या भांडणात चवताळलेल्या जनावरांच्या हल्ल्यात रस्त्याने पायी जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू

- भालचंद्र मालपुरे असे मृत वृद्धाचे नाव

- मोकाट जनावरांनी शिंगावर उचलून पायाखाली तुडवल्याने वृद्धाचा मृत्यू, एक जण जखमी

- संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद

दहावी, बारावीची पुरवणी परीक्षा आजपासून

यात दहावीच्या परीक्षेसाठी ३४ हजार ५६२ आणि बारावीच्या परीक्षेसाठी ६८ हजार ९८ विद्यार्थ्यांनी केली नोंदणी

दरवर्षी जुलै-ऑगस्टमध्ये होणारी ही पुरवणी परीक्षा यंदा जूनमध्येच सुरू होत आहे

राज्य मंडळाने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थी, श्रेणीसुधार करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी देण्यासाठी परीक्षा

राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा

दहावीची परीक्षा २४ जून ते ८ जुलै, तर बारावीची पुरवणी परीक्षा २४ जून ते १६ जुलै  या कालावधीत होणार आहे.

पुरवणी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या

पुणे जिल्ह्यातील धरण साखळी क्षेत्रात रिमझिम पाऊस

पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये किती जलसाठा ?

खडकवासला: 63.60 टक्के

पानशेतः 34.07 टक्के

वरसगावः 42.99 टक्के

टेमघर: 23.68 टक्के

चार ही धरणात एकूण धरण साठा: 38.67 टक्के

मागच्या वर्षी आजच्या दिवशीचा पाणीसाठा: 12.32 टक्के

ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आज जेजुरीकडे मार्गस्थ

सोपानकाकांच्या सासवड नगरीत दोन दिवसांचा मुक्काम केल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आज जेजुरीकडे मार्गस्थ झाली. जेजुरी नगरीमध्ये आज शैव आणि वैष्णवांचा मेळा पहायला मिळणार आहे. खंडेरायाच्या जेजुरीत माऊलींची पालखी दाखल होताच भंडाऱ्याची उधळण करत माऊलींचं स्वागत केलं जातं. हा सोहळा म्हणजे डोळ्यांचा पारणे फेडणारा असतो. लाखो वारकरी आता जेजुरी नगरीकडे निघाले आहेत. माऊलींची पालखी आज जेजुरीत मुक्कामी असणार आहे.

राज्यात झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला

दमदार पावसामुळे पेरण्यामध्ये वाढ

राज्यात 23.27 टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण

गेल्यावर्षी याच दिवशी 19 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या

राज्यात 33 लाख 59 हजार 89 हेक्टर जमिनीवर पेरण्या झाल्या आहेत

सर्वात कमी पेरण्या कोकण विभागात आणि सर्वाधिक पेरण्या या पुणे विभागात झाल्या आहेत

रत्नागिरीतील 28 धरणं 100% भरली

रत्नागिरीत पडणा-या पावसामुळे इथल्या धरण क्षेत्रात कमालीची वाढ झालीय.समाधानकारक पाऊस सध्या रत्नागिरीत पडतोय.जिल्ह्यातील 68 धरणांपैकी 28 धरणं 100 टक्के भरली आहेत.तर 28 धरणं 50 टक्के पेक्षा जास्त भरली आहेत.मंडणगड तालुक्यातील 3, दापोली तालुक्यातील 3, खेडमधील 3, गुहागरमधील 1, चिपळूणमधील 6, संगमेश्वरमधील 3, रत्नागिरीमधील 1, लांजामधील 4, राजापूरमधील 4 धरणं 100 टक्के भरली आहेत.सर्व धरणांमध्ये 305.53 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे.

गोपाल दातकर यांचं आमरण उपोषण मागे

ठाकरे जिल्हाप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर यांचं आमरण उपोषण 5 दिवसांनंतर मागे घेण्यात आले. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या उपस्थित हे उपोषण मागे घेण्यात आले. दहीहंडा परिसरातील पाणीप्रश्न संदर्भात दातकर यांनी उपोषण सुरू केल होत. 5 दिवसानंतर संबंधित विभागाने पाणीपुरवठा दिलेल्या आश्वासनानंतर आमरण उपोषण मागे घेण्यात आले आहे.. दरम्यान, अकोल्यातल्या दहीहांडा व परिसरात नोव्हेंबर 2024 पासून सातत्याने तीव्र पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे, त्यामुळं गोपालं दातकर यांनी दहीहांडा येथे आमरण उपोषण सुरू होते. अखेर दोन गावांसह दररोज पाणीपुरवठा करणार असल्याचे लिखित स्वरूपात आश्वासन दिल्यानंतर दहीहंडा परिसरातील पाणी प्रश्न मार्गी लागलाय..

मोर्णा नदीच्या पुलावरून तरुणाने मारली उडी? शहरभर चर्चा, नागरिकांची घटनास्थळी मोठी गर्दी.

अकोल्यातल्या मोर्णा नदीच्या मोठ्या पुलावरून एका तरुणाने उडी मारली, अशी चर्चा अकोल्यात सर्वत्र झाली.. अकोला पोलिसांपर्यत देखील ही चर्चा पोचली.. पोलिसांसह शोध बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं.. जवळपास रात्री दोन वाजेपर्यंत मोर्णा नदीत आणि पुलाच्या परिसरात शोध मोहीम राबवण्यात आले. मात्र, पुलावरून तरुणाने उडी घेतली असल्याचा सुगावा पोलिसांच्या हाती लागला नाही.. परंतु तरुणाने पुलावरून उडी घेतल्याच्या चर्चेनंतर पोलिसांसह शोध बचाव पथकाची चांगली धावपळ झाली. तसेच घटनास्थळी पाहणाऱ्यांची देखील मोठी गर्दी जमली होती..काल रात्री अकरावाजे पासून सुरू झालेली शोध मोहीम रात्री दोन वाजेपर्यंत चालली होती. तरीही पथकाला खाली हात परतावं लागलं. आता पुन्हा सकाळपासून तरुणाच्या शोधार्थ शोध मोहीम राबवला जाणार आहे. मात्र, तरुणाने नदीच्या पुलावरून उडी घेतलेल्या चर्चेने अकोल्यात एकच खळबळ उडाली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आठवी सुनावणी आज होणार

बीडच्या विशेष मको का न्यायालयासमोर संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आठवी सुनावणी आज होणार आहे.

सुनावणीसाठी स्वतः विशेष सरकारी वकील उज्वल निकम उपस्थित राहणार आहेत.

वाल्मीक कराडच्या दोष मुक्तीच्या अर्जावरती आज न्यायालयात युक्तिवाद होणार आहे.

आरोपी वाल्मीक कराडच्या संपत्ती जप्तीच्या अर्जावरती सरकारी वकील उज्वल निकम युक्तिवाद करणार आहेत.

आरोपी वाल्मीक कराडने दोष मुक्तीसाठी केलेल्या अर्जावरती आज बीड न्यायालयात होणार फैसला.

आरोपींना सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

मुंबई गोवा महामार्गावर कारचा भीषण अपघात, चालकाचा मृत्यू

मुंबई गोवा महामार्गावर कोलाड नजीक खांब येथे कारला भिषण अपघात झाला आहे. या अपघातात कारचालक जागीच ठार झाला तर कारमधील तीन प्रवासी गंभिर जखमी झाले. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातात कारचं मोठं नुकसान झाल असून स्थानिक बचाव पथकांनी मृत आणि जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.

पालकांकडून शालेय साहित्य खरेदीसाठी गर्दी, शालेय साहित्यासह गणवेश महागले‎

अमरावती शहरासह जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या आहेत.शालेय साहित्याने बाजारपेठ सजली असून पालकही साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी करत आहेत.गतवर्षी पेक्षा यंदा शैक्षणिक साहित्य महागले असून यात २५ टक्क्यांनी दरवाढ झाली आहे. वाढत्या महागाईमुळे त्रस्त झालेल्या पालकांच्या खिशाला दरवाढीमुळे कात्री लागली आहे.तर बाजारात शालेय साहित्य घेण्यासाठी चांगलीच गर्दी केली होती.

सामान्यतः कच्चा माल, पेट्रोल व डिझेल यांचे भाव वाढल्याने यावर्षी शालेय साहित्यही महाग झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. पुस्तके, गाईड, वर्क बुक्स सोबतच वह्या, दफ्तर, जेवणाचे आकर्षक डबे आणि वॉटर बॅग्ज अशा साहित्याने बाजारपेठ सजली आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने उत्पादक कंपनीने दरात काही प्रमाणात वाढ केली आहे. दरवर्षी शालेय साहित्य दरवाढीचा सामना पालकांना करावा लागत आहे.

शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक धक्का

सांगलीत शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक धक्का. मिरज शहर प्रमुखासह शेकडो शिवसैनिकांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात केला प्रवेश

विद्यार्थ्यांच्या पायचे ठसे कागदावर उमटवले

बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील खंडाळा येथील जिल्हा परिषद शाळेचा पहिला दिवस आणि शाळेये प्रवेश मोठ्या उत्साह, वातावरणामध्ये संपन्न झाला विद्यार्थ्यांचे अभेक्षण करून विद्यार्थ्यांचे पायाचे ठसे उमटवून हातामध्ये फलक घेऊन नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले आणि विद्यार्थ्यांची खंडाळा गावातून ट्रॅक्टर , मधून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली विद्यार्थ्यांना शाळेय गणवेश बुट व पुस्तके वही पेन शाळेय साहित्याचा वाटप करण्यात आला या वेळी सर्व पालकांनी शाळेकरता सहकार्य केले या मिरवणुकीत पालक ही उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com