
Air India AI2455 विमानाचा अपघात थोडक्यात टळला.
तांत्रिक बिघाड आणि खराब हवामानामुळे विमान चेन्नईला वळवले.
खासदार के. सी. वेणुगोपाल यांच्यासह अनेक खासदार विमानात होते.
Air India Flight: तिरुअनंतपुरमहून राजधानी दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा अपघात थोडक्यात वाचलाय. दिल्लीसाठी उड्डाण घेताच विमान दोन तास हवेतच घिरट्या मारत होते, त्यानंतर चेन्नई विमानतळावर डायव्हर्ट करण्यात आले. चेन्नई विमानतळावर सुरक्षीत लँडिंग करण्यात आले, पण अनेकांचा जीव टांगणीला लागला होता. एअर इंडियाच्या या विमानातून अनेक खासदार प्रवास करत होते.
रविवारी तिरुअनंतपुरमहून नवी दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला अचानक चेन्नईला वळवावे लागले. विमानातील क्रू मेंबर्सला मार्गात खराब हवामानामुळे संशयास्पद तांत्रिक बिघाडाचा अंदाज आला होता, त्यामुळे विमान तात्काळ चेन्नईला डायव्हर्ट करण्यात आले. दरम्यान, चेन्नईत विमानाचे सुरक्षितपणे लँडिंग झाले आहे. विमानाची आवश्यक तपासणी करण्यात येत असल्याचे एअरलाइन्सने सांगितलेय. दरम्यान, या विमानात काँग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्यासह अनेक खासदारही प्रवास करत होते.
एअर इंडियाचे स्पष्टीकरण -
एअर इंडिया प्रवक्त्याने सांगितले की, "१० ऑगस्ट रोजी तिरुअनंतपुरमहून दिल्लीला जाणाऱ्या AI2455 या उड्डाणादरम्यान पायलटला संशयास्पद तांत्रिक अडचण आणि खराब हवामानाचा सामना करावा लागला, त्यामुळे खबरदारी म्हणून विमान चेन्नईकडे वळवण्यात आले आणि ते सुरक्षितपणे उतरले." पुढे त्यांनी म्हटले, "प्रवाशांना झालेल्या असुविधेबद्दल आम्हाला खेद वाटतो. चेन्नईमध्ये आमचे सहकारी प्रवाशांना असुविधा कमी करण्यासाठी मदत करत आहेत."
के. सी. वेणुगोपाल काय म्हणाले ?
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी सोमवारी (11 ऑगस्ट 2025) सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, 'तिरुअनंतपुरमहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडिया विमानात मी, अनेक खासदार आणि शेकडो प्रवासी प्रवास करत होतो. हे विमान आज भयंकर संकटातून बाहेर आले. उड्डाणानंतर काही वेळातच आम्हाला अभूतपूर्व अस्थिरतेचा सामना करावा लागला. विमानाने 2 तास हवेत घिरट्या घेतल्या. '
वेणुगोपाल म्हणाले की, सुमारे एक तासानंतर कॅप्टनने उड्डाण सिग्नलमध्ये बिघाड झाल्याची घोषणा केली आणि विमान चेन्नईकडे वळवले. जवळपास दोन तास आम्ही लँडिंगच्या परवानगीच्या प्रतीक्षेत विमानतळाभोवती चक्कर मारत होतो. आम्हाला सांगण्यात आले की, त्या रनवेवर दुसरे विमान होते. त्या क्षणी कॅप्टनच्या तात्काळ थांबण्याच्या निर्णयामुळे विमानातील सर्व प्रवाशांचे प्राण वाचले. दुसऱ्या प्रयत्नात विमान सुरक्षितपणे उतरले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.