
Ahmedabad Plane Crash : गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. या अपघातात २०० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली आहे. तर ५० हून जण जखमी झाले. त्यांच्यावर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या विमान अपघातातून एका व्यक्तीचा जीव वाचला आहे. या व्यक्तीने ही संपूर्ण घटना कशी घडली, याची माहिती दिली आहे.
अहमदाबादहून लंडनला निघालेल्या विमानात एकूण २३० प्रवासी होते. तर १२ क्रू मेंबर्स होते. विमान अपघाताने परिसरात खळबळ उडाली आहे. प्रवाशांनी भरलेलं विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळलं. या हॉस्टेलमधील काही इंटर्न डॉक्टरांचाही मृत्यू झाला. या भयंकर अपघातातून एका प्रवाशाचा जीव वाचला. या प्रवाशाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सीट नंबर ११ ए वरील प्रवासी जीवंत वाचला.
रमेश विश्वकुमार असे या प्रवाशाचे नाव आहे. 'आधी ब्लास्ट झाला, नंतर विमान कोसळलं. टेकऑफनंतर ३० सेंकदात विमान कोसळलं, अशी माहिती अपघातातून वाचलेल्या रमेश विश्वकुमार यांनी माध्यमांना सांगितलं.
अहमदाबादच्या सरदार पटेल विमानतळावरून विमान लंडनला निघालं होतं. या विमानात १६९ भारतीय प्रवासी होते. तर ५३ ब्रिटीश प्रवासी होते. ७ जण पोर्तग्रीजमधील होते. तर एका कॅनेडियन प्रवाशाचाही समावेश आहे. या विमानात १० कॅबिन क्रू आणि २ पायलट होते. या प्रवाशांमध्ये गुजराचचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील होते. या विमानाने टेकऑफ केल्यानंतर काही मिनिटांत कोसळलं. ७०० फुटांहून जमिनीवर कोसळल्यानंतर विमानाने पेट घेतला.
लंडनला निघालेलं विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळलं. या हॉस्टेलमधील इंटर्न डॉक्टरांचाही मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर परिसरातील नागरिकांची एकच धावाधाव झाली. या अपघातानंतर टाटा समूहाने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १-१ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. या घटनेने मृतांच्या नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.