
योगेश काशिद, साम टीव्ही
बीड : सासरी होणार्या सततच्या छळाला कंटाळून विवाहितेने घरासमोरच्याच विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील देऊळगाव घाटात ही घटना घडली. सविता भाऊसाहेब विधाटे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी अंभोरा पोलिस ठाण्यात भाऊसाहेब विधाटे, सासरा किसन विधाटे आणि सासु लिलाबाई विधाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सविता आणि भाऊसाहेब यांचा विवाह 2008 मध्ये झाला होता. त्यांना दोन मुले आहेत. लग्नानंतर काही काळ विधाटे यांनी बायकोला चांगलं नांदवलं. परंतु मुलांना दूध पिण्यासाठी माहेरहून गाय घेऊन ये म्हणत त्रास द्यायला सुरुवात केली. यानंतर स्कुटीसाठी पैसे मागितले. पुढे काही दिवसांनी सविताच्या नणंदेला अहिल्यानगर येथे घर घ्यायचे असल्याने त्यासाठी पैशांची मागणी सविताच्या माहेरी केली जात होती. यावेळी मात्र वडील काशिनाथ फसले यांनी पैसे नसल्याने देऊ शकत नाही असे सांगितले.
तर दुसरीकडे विधाटे कुटुंबीयांनी स्वतःचे अहिल्यानगर येथील घर विकण्याची तयारी सुरु केली होती. याला सविताने विरोध केला म्हणून पुन्हा त्रास सुरु झाला. शेवटी या त्रासाला कंटाळून सविताने घरासमोरील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात काशिनाथ फसले यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
बीडच्या गेवराई तालुक्यातील एरंडगाव गावामध्ये वर्षा ओमप्रकाश लाखे या महिलेचा मृतदेह विहिरीत मृतदेह सापडला. सासू,नवरा, सासरा आणि इतर नातेवाईकांच्या त्रासाला कंटाळून महिलेने टोकाचं पाऊल उचललं आहे. सासरच्या मंडळीने तिचा घात केल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर महिलेचे नातेवाईक जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले. नातेवाईकांनी संबंधित लोकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.