अमेरिकन कंपनीने भारतातून गाशा गुंडाळला; एकाच वेळी २५० कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं

lay off news : अमेरिकन कंपनीने भारतातून गाशा गुंडाळल्याचे समोर आलं आहे. कंपनीने एकाच वेळी २५० कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं आहे.
AI Impact
lay off news Saam tv
Published On
Summary

कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये एआयचा वाढता वापर

अमेरिकन कंपनीने भारतातून गाशा गुंढाळला

२५० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या

कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये आता एआयचा वापर वाढू लागला आहे. कंपन्यामध्ये एआयचा वापर वाढू लागल्याने दुसरीकडे कर्मचाऱ्यांची कपात करण्यासही सुरुवात झाली आहे. याचदरम्यान एका अमेरिकीन कंपनीने भारतातून गाशा गुंडाळला आहे. यामुळे भारतातील ऑफिसमध्ये काम करणाऱ्या सर्व २५० कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आलं आहे.

अमेरिकन रियल एस्टेट टेक कंपनी 'OpenDoor' ने हा मोठा निर्णय घेतला आहे. या कंपनीने भारतातील कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 'OpenDoor' कंपनीने देखील ने एआयचा वापर करण्यावर भर दिला आहे.

कर्मचाऱ्यांना शेअर केलेल्या एका निवेदनात संबंधित कंपनीचे सीईओ काज नेजातियान यांनी म्हटलं की, काही महिन्यांपूर्वी कंपनीने ओपनडोर २.० लाँच केलाय. त्यावेळी कंपनीत भारताचे २५० कर्मचारी होते.

'आता अमेरिकेतील नागरिकांसाठी नोकर भरती प्रक्रियेची सुरुवात करत आहोत. आम्ही आता भारतात काम बंद करण्याची प्रक्रिया सुरू करत आहोत. यामुळे भारतातील 'ओपनडोर'मधील सर्व सहकाऱ्यांवर परिणाम होणार आहे. विशेष म्हणजे भारतात 'ओपनडोर'साठी ज्यांनी काम केलं, त्यांच्यावर परिणाम होणार आहे'.

AI Impact
राज्यात IT क्षेत्रात खळबळ, पुण्यात रातोरात बड्या कंपनीला टाळं

'भारतातील सहकारी खूप चांगले आहेत. ते खूप चांगलं काम करतात. तुम्ही त्यांना कामावर घ्यायचे असेल, तर तुम्ही कामावर निश्चिंतपणे घेऊ शकता. आम्ही मात्र भारतातून पुन्हा स्वगृही जात आहोत, असेही त्यांनी सांगितले.

नेजातियान यांनी पुढे सांगितलं की, 'ओपनडोरने वर्षभरात मोठी टीम तयारी केली. कंपनीच्या वेगवेगळ्या विभागात सांभाळण्यासाठी टीम तयार केली होती. परंतु आता कंपनीने इन सिस्टम यूनिफाइड करण्यासाठी संपूर्ण अमेरिकेत एआय आधारित ग्राहकांवर लक्ष्य केंद्रीय करण्याचे निश्चित केल्यामुळे ऑपरेशनमध्ये बदल केला आहे'.

AI Impact
3 महिन्यात गेल्या दीड लाख नोकऱ्या, आयटी कंपन्यांकडून नोकरकपात

नेजातियान यांनी पुढे स्पष्ट केलं की, 'आमचा ग्राहक अमेरिकेमधील आहे. त्यांच्यासाठी जवळून कामे करणे सोयीस्कर ठरते. आमची कंपनी कर्मचाऱ्यांबाबत लहान कंपनी असेल, परंतु कंपनीच्या कामाचं नेटवर्क सर्वत्र पसरलं आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com