
गुजरातच्या अहमदाबादमध्ये दुर्दैवी घटना घडली. होर्डिंग लावताना सातव्या मजल्यावरून १० मजूर खाली पडले. यामधील ३ मजूरांचा जागीच मृत्यू झाला तर इतर जण जखमी झाले आहेत. जखमी मजुरांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबाद येथील विश्व कुंज -२ या बहुमजली इमारतीच्या सातव्या मजल्यावर होर्डींग लावण्याचे काम सुरू होते. यादरम्यान संतुलन बिघडल्यामुळे १० मजूर खाली पडले. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर जखमींवर सध्या सोला सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी सांगितले की, मृतांची ओळख पटवण्यात यश आले आहे. ते तिघेही उत्तर प्रदेशचे रहिवासी होते. रवी, राज आणि महेश अशी मृत मजुरांची नाव आहेत. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा सर्व मजूर एका जाहिरात कंपनीचे २५X10 फुटांचे होर्डिंग लावण्याचे काम करत होते. होर्डिंग लावणारी कंपनी आणि सोसायटीमध्ये रेंटबाबत करार झाला होता. पण अद्याप हे स्पष्ट झाले नाही की होर्डिंग लावण्यासाठी एएमसीची परवानगी घेण्यात आली होती की नाही.'
प्रत्यक्षदर्शिने सांगितले की, होर्डिंगचा एक भाग तुटला आणि खाली पडला. हा तुकडा जवळच्या विजेच्या खांबाला जाऊन धडकला. त्यामुळे जोरदार झटका बसला आणि विजेची तार तुटली. पडणाऱ्या स्ट्रक्चर खाली येऊन एका कारचे मोठे नुकसान झाले. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ देखील समोर आला आहे. त्यामध्ये स्पष्ट दिसत आहे की एक मजूर स्ट्रक्चर सोबत खाली पडतो त्यानंतर इतर मजूर खाली पडतात. त्यानंतर काही लोकं मदतीसाठी धावून येतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.