Gujarat Bridge Collapsed: गुजरातमध्ये नदीवरील पूल मधोमध तुटला, ९ जणांचा मृत्यू, पीएम मोदींकडून मदत जाहीर

Bridge Collapsed in Gujarat: गुजरातमध्ये पूल कोसळून ९ जणांचा मृत्यू झाला. तर ६ जण जखमी झाले. महिसागर नदीवरील पूल आज सकाळी कोसळला. पुलावरून अनेक गाड्या नदीत पडल्या. घटनास्थळावर मदतकार्य सुरू आहे.
Bridge Collapsed in Gujarat
Bridge Collapsed in GujaratSaam Tv
Published On

गुजरातमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आज सकाळी मोठी दुर्घटना घडली. वडोदरा आणि आणंदाला जोडणारा महिसागर नदीवरून पूल कोसळला. पूल कोसळल्यामुळे अनेक वाहनं नदीत पडली. या दुर्घटनेत आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला तर ६ जणांपेक्षा अधिक जणांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. या सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

महिसागर नदीवरील गंभीरा पूल आज सकाळी मधोमध तुटला. पुलावरून जाणारी अनेक वाहनं नदीत पडली. तर पूल तुटल्यामुळे अनेक प्रवासी त्यावर अडकून राहिले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्यस सुरू केले. त्यांनी आतपर्यंत ९ जणांचे मृतदेह बाहेर काढले. ही घटना घडली तेव्हा फक्त २ जणांचा मृत्यू झाला. पण आता मृतांचा आकडा वाढून ९ वर पोहचला आहे. ६ जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गुजरातमधील पूल कोसळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करताना त्यांनी सांगितले की, 'वडोदरा येथे पूल कोसळल्याने अनेकांचे जीव गेले. या घटनेने मला खूप दुःख झाले. मृतांच्या कुटुंबियांबद्दल माझ्या मनापासून संवेदना आहेत. जखमी लवकर बरे होतील अशी आशा आहे.' पीएम मोदींनी यासोबतच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपये मदत जाहिर केली.

Bridge Collapsed in Gujarat
Gujarat: दारूच्या नशेत पोलीस, आदिवासी तरूणाला नग्न करून अमानुष मारहाण; व्हिडिओही केला व्हायरल

दरम्यान, पूल कोसळल्याने वडोदरा आणि आणंदमधील संपर्क तुटला आहे. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पोलिसांनी वाहतूक वळवली आहे. हा पूल कोसळल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. आता प्रवाशांना वडोदरा ते आणंद किंवा आणंद ते वडोदरा प्रवास करण्यासाठी ४० किलोमीटरचा लांब वळसा घ्यावा लागेल.

Bridge Collapsed in Gujarat
Gujarat Bridge Collapse: गुजरातमध्ये मोठी दुर्घटना! महिसागर नदीवरील पूल कोसळला, अनेक वाहनं गेली वाहून; पाहा थरारक VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com