Gujarat: दारूच्या नशेत पोलीस, आदिवासी तरूणाला नग्न करून अमानुष मारहाण; व्हिडिओही केला व्हायरल

Gujarat Police Brutally Assault Tribal Youth: गुजरात पोलिसांनी आदिवासी युवकाला नग्न करून मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल; आदिवासी संघटनांकडून ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्ह्याची मागणी.
Nandurbar Crime
Nandurbar CrimeSaam TV News
Published On

माणुसकीला काळिमा फासणारी घटना गुजरात हद्दीतील गावातून उघडकीस आली आहे. आदिवासी तरूणाला नग्न करून बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ही मारहाण पोलीस कर्मचाऱ्याने केली असून, या घटनेनंतर आदिवासी संघटना आक्रमक झाले आहेत. त्यांनी ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ही घटना नंदुरबार जिल्ह्याच्या सीमा लगत असलेल्या गुजरातमधील कुकरमुंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. एका आदिवासी तरूणासोबत अमानुष मारहाणीचा प्रकार घडला. एका पोलिसांनी दारूच्या नशेत तरूणाला बेदम मारहाण केली. इतकंच नाही तर, नग्न करून मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. याची माहिती गावात पसरताच आदिवासी संघटना आक्रमक झाले.

गावकऱ्यांनी तातडीने पोलीस कर्मचाऱ्याविरोधात कारवाईची मागणी केली आहे. तसेच संबंधित पोलील कर्मचाऱ्याविरोधात ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या घटनेनंतर आदिवासी तरूणाचा मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे.

Nandurbar Crime
Gold Rates:ग्राहकांसाठी खुशखबर, सोनं पुन्हा स्वस्त झालं, आजचा २४ आणि २२ कॅरेट सोन्याचा दर किती?

ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारे बारवी धरण ५०% भरले

ठाणे जिल्ह्यासह अनेक शहरांना पाणीपुरवठा करणारे बदलापूरजवळील एमआयडीसी बारवी धरण जून महिन्यातच ५० टक्क्यांपर्यंत भरले आहे. गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. बारवी धरण क्षेत्रात आतापर्यंत ९९९ मिमी पावसाची नोंद झाली असून, या तुलनेत मागील वर्षी याच दिवशी केवळ २५.३६% पाणीसाठा होता. यावर्षीचा साठा जवळपास दुप्पट झाल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले आहे.

Nandurbar Crime
Cabinet Decision: शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपदानाला मंजूरी; फडणवीस सरकारच्या बैठकीत ८ महत्त्वाचे निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com