गुजरातच्या भरूच जिल्ह्यातील पानोली औद्योगिक परिसरात भीषण आग.
संघवी ऑरगॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड कारखान्यातून धूर आणि आगीचे लोळ.
१५ पेक्षा जास्त अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल.
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट; जीवितहानीची माहिती नाही.
परिसरात भीतीचे वातावरण, आगीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
Gujarat Industrial Fire: गुजरातमध्ये शनिवारी रात्री भयंकर आग लागली आहे. आज सकाळपर्यंत ही आग सुरूच आहे. अद्याप आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेले नाही. जीआयडीसी पानोली येथील संघवी ऑरगॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये भीषण आगीची घटना घडली आहे. धूर आणि आगीचे लोळ पाहून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशामन दल आणि पोलिसांनी घटानस्थळी धाव घेतली आहे. अग्निशामन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. या भीषण आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. सुदैवाने या आगीत अद्याप कोणत्याही जीवितहानीबाबत माहिती समोर आलेली नाही. अद्याप आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरूच आहे. या आगीचा व्हिडिओ समोर आलाय.
गुजरातमधील भरूच जिल्ह्यातील पानोली येथील जीआयडीसीमधील संघवी ऑरगॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यात शनिवारी मोठी आग लागली. रविवारी सकाळीही ही आग अद्याप आटोक्यात आलेली नाही. आगीच्या परिसरात धुराचे आणि ज्वाळांचे लोट दिसत आहे. आग इतकी भीषण आहे की पाच ते १० किमीवरूनही आगीचे लोट दिसत आहे. भीषण आगीमुळे औद्योगिक परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालेय. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सध्या सुरू आहे. आगीचे नेमके कारण आणि नुकसान अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, गुजरातमध्ये २ एप्रिल रोजी बनासकांठा जिल्ह्यातील डीसा येथे भीषण आग लागली होती. गोदामातून चालणाऱ्या बेकायदेशीर फटाक्याच्या कारखान्यात लागलेल्या भीषण स्फोटामुळे तेव्हा आग लागली होती. त्यामध्ये २१ जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना डोळ्यासमोर ताजी असतानाच गुजरातमध्ये आणखी एक भयंकर आगीची घटना घडली आहे. पानोलीतील आग अद्याप आटोक्यात आलेली नाही. आग आटोक्यात आणण्यासाठी १५ हून अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. आग जवळच्या युनिट्समध्ये पसरू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.