Gujarat Bridge Collapse Update : गुजरात पूल दुर्घटनेत मोठी अपडेट; चार अधिकाऱ्यांचं निलंबन, मृतांचा आकडा १८वर

Gujrat Bridge Collapse : गुजरातमधील वडोदरा-आणंदला जोडणारा ४३ वर्ष जुना गंभीरा पूल बुधवारी कोसळला. पुलावरची वाहने नदीत पडून १८ जणांचा मृत्यू झाला असून ३ अद्याप बेपत्ता आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही भीषण दुर्घटना घडल्याचा आरोप होत आहे.
Gujarat Bridge Collapse Update
Gujarat Bridge Collapse UpdateSaam Tv
Published On

गुजरातमध्ये बुधवारी वडोदरा आणि आणंदला जोडणारा महीसागर नदीवरील ४३ वर्षे जुना गंभीरा पूल पडल्याची धक्कादायक घटना घडली. लोक दैनंदिन वाहतुकीसाठी या पुलाचा वापर करत होते. नेहमीप्रमाणे सुरु असलेल्या रहदारी दरम्यान हा पूल पडला आणि पुलावर असलेली वाहने नदीत पडली. या दुर्घटनेत मृतांचा आकडा १८ वर गेला आहे. मृतांचा आकडा वाढत असून अजूनही ३ जण बेपत्ता आहे. तर याप्रकरणात ४ अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आले आहे.

वडोदरा आणि आणंदाला जोडणारा महीसागर नदीवरील सर्वात जुना पूल बुधवारी अचानक पडला. पुलावरून वाहने जात असताना ही घटना घडली. हा पूल मधल्या मध्ये तुटल्याने अनेक वाहने नदीत पडली. बुधवारी ३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता मृतांचा आकडा १८ वर गेला आहे. तर ३ जण अद्यापही बेपत्ता असल्याचं म्हटलं जात आहे.

Gujarat Bridge Collapse Update
Gujrat Factory Explosion : गुजरातमध्ये अग्नीतांडव! फटाका कारखान्यात भीषण स्फोट, १७ जणांचा मृत्यू; मालक फरार

या भीषण दुर्घटनेने राज्य हादरले असून या घटनेनंतर गुजरात सरकारने तातडीने कठोर पाऊले उचलत रस्ते आणि इमारत विभागाच्या चार अभियांत्यांना निलंबित केले आहे. हा गंभीरा पूल १९८२ मध्ये बांधण्यात आला होता आणि तेव्हापासून त्याची दुरुस्ती झालेली नाही. स्थानिक लोक आणि वाहनचालक बऱ्याच काळापासून पुलाच्या हादऱ्या आणि कमकुवत स्थितीबद्दल तक्रारी करत आहेत, परंतु प्रशासनाकडून कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आले नाही.

Gujarat Bridge Collapse Update
Gujrat Crime: संतापजनक! बलात्काराच्या आरोपानंतर कोठडी, जामिनावर बाहेर येताच ७० वर्षीय पीडितेवर आरोपीकडून पुन्हा अत्याचार

सौराष्ट्रातून येणारी जड वाहने टोल टॅक्स वाचवण्यासाठी या पुलाचा वापर करत असल्याचे सांगितले जात आहे. अलिकडेच या पुलाच्या शेजारी नवीन पूल बांधण्याची योजना मंजूर करण्यात आली होती, परंतु अद्याप काम सुरू झालेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com