
Ahmedabad Bullet Train Station Fire : गुजरातमध्ये बुलेट ट्रेन स्टेशनला सकाळी साडेसहाच्या सुमारास आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. वेल्डिंगचे काम सुरु असताना आग लागल्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. आगीचा भडका झाल्यानंतर तेथील कामगारांना तात्काळ बाहेर काढण्यात आले. या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात अहमदाबादमधील साबरमती बुलेट ट्रेन स्टेशनचे बांधकाम सुरु आहे. आज (८ फेब्रुवारी) सकाळी ६.३० च्या सुमारास स्टेशनच्या एका भागाच्या छताचे शटर वेल्डिंगचे काम सुरु असताना आग लागली. ही माहिती मिळताच अहमदाबाद अग्निशमन आणि आपत्कालीन सेवाद्वारे (AFES) १४ अग्निशमन दलांच्या गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाठवण्यात आले.
स्टेशनच्या तिसऱ्या मजल्यावरच्या टेरेसवर सुमारे १५ मीटर उंचीवर आग लागली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सकाळी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वेल्डिंगच्या ठिणग्या लाकडी फळ्यांवर पडल्याने ही आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. एएफईएसला आग आटोक्यात आणण्यासाठी चार तास लागले. सुदैवाने या घटनेमध्ये कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती विभागीय अधिकारी इनायत शेख यांनी दिली.
'आज सकाळी ६.३० च्या सुमारास, साबरमती बुलेट ट्रेन स्टेशनच्या एका भागच्या छताच्या शटरला आग लागली. कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी शटरिंगचे काम सुरु असताना वेल्डिंगच्या ठिणग्यांमुळे आग लागली असावी असा अंदाज आहे. घटनास्थळाचे निरीक्षण सुरु आहे' असे माहितीपर पत्रक नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने जारी केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.