Air India Plane Crash : अहमदाबाद दुर्घटनेत मोठा खुलासा; अपघातग्रस्त विमानाचे दोन्ही इंजिन निकामी?

Ahmedabad Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या तपासात एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. एअर इंडियाचे बोईंग ७८७ विमान कोसळलं तेव्हा त्याची आपत्कालीन वीज व्यवस्था सुरू होती, असं आढळून आलं आहे.
Ahmedabad Air India Plane Crash
Ahmedabad Air India Plane CrashSaam Tv News
Published On

अहमदाबाद : अहमदाबाद विमान अपघाताच्या तपासात एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. एअर इंडियाचे बोईंग ७८७ विमान कोसळलं तेव्हा त्याची आपत्कालीन वीज व्यवस्था सुरू होती, असं आढळून आलं आहे. यामुळे विमानाचे दोन्ही इंजिन उड्डाणाच्या वेळी निकामी झाले होते की इतर कोणत्याही यंत्रणेत समस्या होती? असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

वॉल स्ट्रीट जर्नलने विमान अपघाताची चौकशी करणाऱ्या पथकाच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. या अपघातात सुमारे २७० जणांचा मृत्यू झाला, त्यापैकी २४१ जण विमानातील प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते तर उर्वरित वैद्यकीय विद्यार्थी आणि या अपघाताचे बळी ठरलेले इतर लोक होते. या अपघाताची चौकशी सुरू आहे. प्राथमिक तपासात सर्वात धक्कादायक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे आपत्कालीन वीज व्यवस्था सुरू होती.

Ahmedabad Air India Plane Crash
डुलकी आली अन् आक्रित घडलं, भरधाव कार डिव्हायडरला धडकून खड्ड्यात पडली; कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू

आपत्कालीन वीज व्यवस्था म्हणजे काय?

प्रत्येक विमानात आपत्कालीन वीज प्रणाली असते, त्याला राम एअर टर्बाइन किंवा RAT म्हणतात. हा एक लहान प्रोपेलर आहे. तो बोईंग ७८७ ड्रीमलाइनच्या पंखांच्या अगदी खाली स्थित होता. तो विमानासाठी बॅकअप आणि जनरेटर म्हणून काम करतो. जेव्हा इंजिन काम करत नसतील तेव्हाच त्याची आवश्यकता असते, जर इंजिन योग्यरित्या काम करत असतील तर विमान सहजपणे प्रवास पूर्ण करू शकेल यासाठी वीज निर्माण करणे ही त्यांची जबाबदारी असते.

ही प्रणाली कधी सक्रिय होते?

एअर कमांडर ए.एस. बहल यांनी सांगितलं की, जेव्हा विमानाचे दोन्ही इंजिन निकामी होतात किंवा हायड्रॉलिक सिस्टीमचा दाब कमी होतो तेव्हा असं घडतं. वॉल स्ट्रीट जर्नलने बोईंग मॅन्युअलचा हवाला देत सांगितलं आहे की, कॉकपिट उपकरणांमध्ये वीज बिघाड झाल्यास किंवा विमानाच्या इलेक्ट्रिक मोटर पंपमध्ये समस्या असल्यास देखील ते सक्रिय होऊ शकतं. पायलटला गरज पडल्यास ही प्रणाली मॅन्युअली सक्रिय केली जाऊ शकते.

Ahmedabad Air India Plane Crash
Air Indiaच्या आणखी एका विमानात मोठ्ठा बिघाड, दिल्लीहून पॅरिसला जाणारे विमान रद्द; प्रवाशांमध्ये खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com