Crime News: गर्लफ्रेंडच्या त्रासाला कंटाळला, TCS मॅनेजरनंतर आणखी एका तरुणाची आत्महत्या, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Agra Youth End Life: TCS मॅनेजरच्या आत्महत्येनंतर आग्र्यामध्ये आणखी एका तरुणाने गर्लफ्रेंडच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी तरुणाने सुसाईड नोट आणि व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला होता.
Crime News: गर्लफ्रेंडच्या त्रासाला कंटाळला, TCS मॅनेजरनंतर आणखी एका तरुणाची आत्महत्या, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
Agra Youth End LifeSaam Tv
Published On

आग्रामध्ये टीसीएस मॅनेजर मानव शर्मा यांनी बायकोच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला होता. टीसीएस मॅनेजरच्या आत्महत्येची घटना ताजी असतानाच आग्र्यामध्ये आणखी एका तरुणाने गर्लफ्रेंडच्या छळाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलंत जीवन संपवलं. या तरुणाने देखील सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत आत्महत्या केली. त्याची सुसाईड नोट देखील समोर आली आहे.

१६ फेब्रुवारी रोजी किरवली येथील अछनेरा पोलिस स्टेशन हद्दीमध्ये एका तरुणाने आत्महत्या केली. शुक्रवारी तरुणाची सुसाईड नोट आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या तरुणाने त्याच्या आत्महत्येसाठी गर्लफ्रेंड आणि तिच्या कुटुंबाला जबाबदार धरले आहे. मृत तरुणाच्या कुटुंबाच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याची गर्लफ्रेंड आणि तिच्या कुटुंबाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News: गर्लफ्रेंडच्या त्रासाला कंटाळला, TCS मॅनेजरनंतर आणखी एका तरुणाची आत्महत्या, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
Crime News: गाण्यावरुन शेजाऱ्यांमधे जोरदार भांडण, झाडाला बांधून बेदम मारहाण, मृतदेह २० किलो मिठात पुरला, अन्...

राजेंद्र सिंग यांचा मुलगा जितेंद्र कुमार उर्फ ​​बंटी बघेलने आत्महत्या केली. जितेंद्रला दोन बहिणी देखील आहेत. एका खासगी कंपनीत तो काम करत होता. १६ फेब्रुवारी त्याने घरातील एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेनंतर, कुटुंबाला कळले की जितेंद्रने त्याच्या फेसबुक अकाउंटवर एक व्हिडिओ आणि एक सुसाईड नोट शेअर केली आहे.

व्हिडिओ आणि सुसाईड नोटमध्ये, त्याने त्याची गर्लफ्रेंड आणि तिच्या कुटुंबियांच्या धमक्या आणि पैसे हडप करूनही लग्न न केल्याचा उल्लेख केला होता. जितेंद्रच्या कुटुंबातील सदस्यांनी अछनेरा पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी जितेंद्रची गर्लफ्रेंड नीरू, तिचा भाऊ मनोज, सौरभ, वडील कमल सिंग फौजी आणि आई मीना देवी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Crime News: गर्लफ्रेंडच्या त्रासाला कंटाळला, TCS मॅनेजरनंतर आणखी एका तरुणाची आत्महत्या, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
Nashik Crime News: कॅफेचं भाडं १०० -२०० रुपये तास, तरूण-तरुणींचे अश्लील चाळे; महिला आमदारानं टाकली धाड; पाहा VIDEO

जितेंद्रने आत्महत्येपूर्वी २ मिनिटं २९ सेकंदाचा व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये तो सांगत आहे की, त्याचे ज्या मुलीशी प्रेमसंबंध होते तिच्याशी त्याला लग्न करायचे होते. लग्नाच्या बहाण्याने त्या मुलीने हळूहळू त्याच्याकडून सुमारे सात लाख रुपये हडप केले. असे असूनही, तिच्याकडून लग्नाला नकार मिळत राहिला. जेव्हा त्याने त्याचे पैसे परत मागितले तेव्हा मुलीने तिच्या कुटुंबातील सदस्यांसह त्याला धमकावण्यास सुरुवात केली. त्याला दररोज धमक्या येऊ लागल्या. त्यांनी त्याला आत्महत्येचे पाऊल उचलण्यास भाग पाडले.

Crime News: गर्लफ्रेंडच्या त्रासाला कंटाळला, TCS मॅनेजरनंतर आणखी एका तरुणाची आत्महत्या, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
Pune Crime News: दुचाकी दुरूस्तीवरून वाद, गावगुंडांना बोलावून मॅनेजरला जबर मारहाण; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com