उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, नोटांचा डोंगर बघून अधिकारी चक्रावले

Venkat Reddy Illegal Assets Worth 8 Crore Case: तेलंगणातील उपजिल्हाधिकारी वेंकट रेड्डी यांच्या घरावर एसीबीची धाड. कोट्यवधींची बेहिशेबी संपत्ती, रोख रक्कम, सोने, विला आणि फार्महाऊस जप्त. संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू.
ACB officials during a raid at the residence linked to former Sub-Divisional Officer Venkat Reddy in Telangana.
ACB officials during a raid at the residence linked to former Sub-Divisional Officer Venkat Reddy in Telangana.Saam Tv
Published On

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरात धाड टाकली आणि समोरील दृश्य बघताच अधिकाऱ्यांची पाया खालची जमीनच सरकली. यामध्ये पैशांचा ढीगच्या ढीग दिसला आणि अधिकारीही चक्रावले. तेलंगणा येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी हनुमाकोंडाच्या उपजिल्हाधिकारी वेंकट रेड्डीच्या घरी आणि त्याच्या नातेवाईकांच्या घरी एकाचवेळी छापे टाकले. यामध्ये कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली.

ACB officials during a raid at the residence linked to former Sub-Divisional Officer Venkat Reddy in Telangana.
Crime News : घरगुती वाद टोकाला गेला, काकाने पुतण्याचा झोपेतच काटा काढला; बुलढाण्यातील धक्कादायक घटना

या अधिकाऱ्याचे कारनामे याधीही उघडकीस आले होते. यामुळे त्याचे निलंबन देखील झाले होते. प्रभागी जिल्हा शिक्षण अधिकारी असताना 1 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप असताना वेंकट रेड्डी यांना यापूर्वी 6 डिसेंबर रोजी एसीबीने अटक केली होती. त्यानंतर राज्य सरकारने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारत त्यांना बडतर्फ केले होते.

ACB officials during a raid at the residence linked to former Sub-Divisional Officer Venkat Reddy in Telangana.
Crime News : आरडीचे पैसे भरायला गेले ते परत आलेच नाही, गडचिरोलीतील 'त्या' हत्याकांडाबाबत मोठी अपडेट समोर

पोलिसांनी अधिक तपासासाठी आज लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने हैदराबाद येथील रॉकी टाउन कॉलनी आणि इतर संबंधित ठिकाणी छापे टाकले. या छाप्यात त्यांना 30 लाख रुपयांची रोख रक्कम आणि इतर काही वस्तु आढळून आल्या. एसीबीने विशेष पथकासह आठ ठिकाणी राज्यात धाडी टाकत तपासणी केली असता लाखो रुपयांचे घबाड सापडले.

ACB officials during a raid at the residence linked to former Sub-Divisional Officer Venkat Reddy in Telangana.
Crime: तरुणीला मध्यरात्री बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत पकडलं, कुटुंबीयांनी फावड्याने हल्ला करत दोघांना जागीच संपवलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेंकट रेड्डीकडे 2008 पासून बेकायदेशीर मालमत्ता होती. त्याच्यावर 2016 आणि 2017 मध्ये नॅशनल हाइवेच्या स्कीममध्ये घोटाळा केल्याचा आरोप होता. यामध्ये त्याने शेतकऱ्यांना मिळालेल्या मोबदल्यात गैरव्यवहार केला असल्याचा आरोप आहे. आतापर्यंत तब्बल 8 करोड 30 लाख रुपयांची बेकायदेशीर संपत्ती आढळून आली आहे. यामध्ये रोख रक्कम आणि सोनेच्या व्यतिरिक्त 6 करोड रुपयांचा एक विला आणि फार्महाऊसचा सहभाग आहे. या घटनेचा सखोल तपास पोलीस अधिकारी आणि लाचलुचपत विभाग करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com