Raghav Chadha: 'आप'ने राघव चड्ढा यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी; राज्यसभेत बनवलं पक्षाचा नेता

AAP : राज्यसभेतील निलंबन रद्द केल्यानंतर राघव चढ्ढा यांच्यावर आम आदमी पक्षाने मोठी जबाबदारी सोपवण्यात आलीय. संजय सिंह यांच्याकडील जबाबदारी चढ्ढा यांच्यावर देण्यात आलीय. जवळपास ११५ दिवस राघव चढ्ढा यांना निलंबित करण्यात आले होते.
Raghav Chadha
Raghav ChadhaANI
Published On

AAP MP Raghav Chadha :

आम आदमी पार्टीने राघव चढ्ढा यांना परत एकदा मोठी जबाबदारी दिलीय. राघव चढ्ढा यांची राज्यसभेत पक्षनेता म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. राज्यसभेत आपचा नेते संजय सिंह यांच्यावर या पदाची जबाबदारी होती. परंतु दारू धोरणाच्या कथित घोटाळ्यात संजय सिंह यांना तुरुंगवारी करावी लागली. यामुळे त्यांच्या जागेवर चढ्ढा यांची नियुक्ती करण्यात आलीय.(Latest News)

गेल्या काही दिवसांपूर्वी राघव चढ्ढा यांना संसदेतून निलंबित करण्यात आले होते. परंतु मोठ्या वादानंतर चढ्ढा यांना परत त्यांची सदस्यता देण्यात आली होती. राज्यसभेतील त्यांचे निलंबन संपल्यानंतर राघव चढ्ढा यांनी व्हिडिओ जारी करून लोकांचे आभार मानले होते. एक अतिशय भावूक व्हिडिओ जारी करत त्यांनी नागरिकांचे आभार मानले होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मी ११५ दिवस लोकांचा आवाज संसदेत ठेवू शकलो नाही. ११ ऑगस्ट रोजी मला राज्यसभेतून निलंबित करण्यात आलं होतं. म्हणजेच भारताच्या संसदेतून मला निलंबित करण्यात आलं होतं. मी आपल्या निलंबन रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेलो. न्याय मंदिरात जाऊन मला न्याय मागावा लागला, असं चढ्ढा या व्हिडिओत म्हणाले होते.

११५ दिवस होते निलंबित

राज्यसभेत मला निलंबित करण्याच्या विरुद्धात सर्वोच्च न्यायालयात मी याचिका दाखल होती. या याचिकेची दखल घेत सर्वोच्च न्यायालायाने ११५ दिवसांनंतर माझे निलंबन रद्द केलं. या दिवसात मी आपला आवाज उठवून शकलो नाही. सरकारकडून आपल्या प्रश्नाचे उत्तर मागू शकलो नाही. मला आनंद आहे की, माझं निलंबन रद्द केलं. मी सर्वोच्च न्यायालय आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांचे आभार मानतो,असंही चढ्ढा म्हणालेत.

Raghav Chadha
MP Raghav Chadha Suspended: आम आदमी पक्षाला मोठा धक्का! खासदार राघव चढ्ढा राज्यसभेतून निलंबित

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com