MP Raghav Chadha Suspended: आम आदमी पक्षाला मोठा धक्का! खासदार राघव चढ्ढा राज्यसभेतून निलंबित

MP Raghav Chadha News: आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे.
MP Raghav Chadha Suspended
MP Raghav Chadha SuspendedSaamtv
Published On

MP Raghav Chaddha News: आम आदमी पक्षाला राज्यसभेत मोठा धक्का बसला आहे. आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय आपचे दुसरे खासदार संज सिंह यांच्यावरही निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.

MP Raghav Chadha Suspended
Amit Shah News: राजद्रोह कायदा रद्द करणार.. गृहमंत्री अमित शहांची मोठी घोषणा; लोकसभेत CrPC दुरुस्ती विधेयक सादर

काय आहे प्रकरण?

याबाबत अधिक माहिती अशी की, त्यांच्या संमतीशिवाय दिल्ली सेवा विधेयक निवड समितीकडे पाठवण्याच्या प्रस्तावावर सह्या करण्यात आल्याचा दावा राज्यसभेतील पाच खासदारांनी केला होता. यामध्ये भाजपचे (BJP) तीन, बीजेडी आणि एआयएडीएमकेचे एक खासदार आहेत ज्यांनी याबाबत निषेध नोंदवला आहे.

हा प्रस्ताव आपचे खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांनी मांडला होता. हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. याच प्रकरणात खासदार राघव चढ्ढा यांना निलंबित केले आहे. याआधी संजय सिंह यांना संपूर्ण पावसाळी अधिवेशनातून निलंबित केल्याने आपसाठी हा दुसरा मोठा धक्का मानला जात आहे.

MP Raghav Chadha Suspended
Adhir Ranjan Chowdhary suspended : PM नरेंद्र मोदींची नीरव मोदीशी तुलना, अधीर रंजन चौधरी निलंबीत

दरम्यान, खासदार राघव चढ्ढा यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्यावर लावलेले सर्व आरोप खोटे असून विशेषाधिकार समितीने पाठवलेल्या नोटिशीला उत्तर देवू असे ते म्हणाले आहेत. तसेच भाजपच्या आरोपांचा पर्दाफाश करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com