Indian Navy: अरबी समुद्रात मालवाहू जहाज अपहरणाचा प्रयत्न; भारतीय नौदलाने उधळून लावला कट

माल्टा-ध्वज असलेल्या जहाजाचं अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटनेनंतर भारतीय नौदल सतर्क झाले आहे. ज्या भागात घडली त्या भागात नौदलाने गस्ती विमान तैनात केले आहे.
Indian Navy
Indian NavyANI file Photo
Published On

Cargo Ship Hijacking In Arabian Sea:

भारतीय नौदलाने सोमालियन चोरट्यांचा डाव हाणून पाडलाय. अरबी समुद्रात मालवाहक जहाजाचं अपहरण करण्याचा प्रयत्न भारतीय नौदलाने हाणून पाडलाय. १८ कॅप्टनसह इतर सदस्य असलेला माल्टा-ध्वज असलेल्या जहाजाचं अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटनेनंतर भारतीय नौदल सतर्क झाले असून अरबी समुद्रात कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दिलीय.(Latest News)

ज्या भागात घडली त्या भागात भारतीय नौदलाने गस्ती विमान तैनात केले आहे. जहाजात सोमलियान लुटारू असू शकतील असा संशय नौदलाकडून वर्तवण्यात येत आहे. अपहरणाचा प्रयत्न करण्यात आलेल्या जहाजावर विमानातून नजर ठेवली जात आहे. दरम्यान हे जहाज (ship)सोमालिया (Somalia) किनाऱ्याकडे जात असल्याचं दिसत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या स्थितीवर प्रतिक्रिया देताना भारतीय नौदलाने सांगितलं की, नौदलाने अदनच्या खाडीत चाचेगिरीवर पाळत ठेवण्यासाठी आणि एमव्ही रूएनला शोधण्यासाठी सागरी गस्ती विमान पाठवले आहे. अपहरण होत विमानावर नजर ठेवण्यासाठी १५ डिसेंबर रोजी विमानाने उड्डाण घेतलीय. विमानाकडून जहाजाच्या हालचालीवर नजर ठेवली जात आहे. अदनच्या खाडीमध्ये तैनात असलेल्या भारतीय नौदलाच्या युद्धनौकाने या जहाजाला एमव्ही रूएनला रोखलं. इतर यंत्रणेच्या मदतीने जहाजाच्या स्थितीवर लक्ष ठेवलं जात आहे.

Indian Navy
Kerala Road Accident: भाविकांवर काळाचा घाला! देवदर्शनाहून परतताना बस आणि रिक्षाची धडक; ५ जणांचा मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com