Delhi Assembly Election: दिल्लीत राजकीय भूकंप; अरविंद केजरीवाल यांना धक्के, आपच्या आमदारांचे धडाधड राजीनामे

AAP MLA's Resignation: राजीनामा देणाऱ्यांमध्ये बिजवासनचे आमदार भूपेंद्र सिंह जून यांचाही समावेश आहे. सर्व आमदारांनी राजीनाम्यात आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केलेत.
Delhi Assembly Election
AAP MLA's ResignationGetty
Published On

ऐन दिल्ली विधानसभा निवडणुकीआधी आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसलाय. आपच्या आमदारांनी एकानंतर एक सात आमदारांनी राजीमाने देत अरविंद केजरीवाल यांचं टेन्शन वाढवलंय. ऐन निवडणुकीच्या आधी आमदारांचे राजीनामे पडल्यानं दिल्लीतील राजकारण धुराळा उडलाय. दरम्यान या आमदारांच्या राजीनाम्यामुळे आप च्या सरकारला कोणताच धोका नाहीये. निवडणूक होईपर्यंत दिल्लीत काळजीवाहू सरकार आहे.

राजीनामा देणाऱ्यांमध्ये जनकपुरीचे बारचे आमदार राजेश ऋषी, कस्तुरबानगरचे आमदार मदन लाल, मेहरौलीचे आमदार नरेश यादव, त्रिलोकपुरीचे आमदार आणि दलित नेते रोहित कुमार, पालमचे आमदार भावना गौर, बिजवासनचे आमदार भूपेंद्र सिंह जून, आर्दश नगरचे आमदार पवन शर्मा यांनीही पक्षाला रामराम केलाय. दरम्यान हे आमदार पक्षावर नाराज होते. अरविंद केजरीवाल यांनी या सर्वांचे तिकीट कापले होते. परंतु आतापर्यंत एकजूट दिसणाऱ्या आपमध्ये आता बिघाडी झाल्याचं दिसत आहे.

माजी आमदार रोहित कुमार मेहरोलिया यांनी सोशल मीडियावर राजीनामा पत्र पोस्ट केले आहे. यांना फक्त बाबासाहेबांचा फोटो हवा पण त्यांचे विचार नको, अशा संधी साधू आणि बनावटी लोकांशी माझं नातं संपलं @AamAadmiParty पक्षाच्या प्राथमिक सदस्यासह सर्व पदांचा राजीनामा देतो, असं मेहरोलिया यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. तर महरौलीचे आमदार नरेश यादव यांनी पक्षाला भ्रष्टाचारी म्हटलंय.

आम आदमी पक्षाचा उदय हा भ्रष्टाचार विरोधात सुरू झालेल्या अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे झाला होता. परंतु आज मी खूप दु:खी आहे, कारण आम आदमी पक्षच भ्रष्टाचाराच्या दलदलीत फसलाय. तर पालम येथील आमदाराचा अरविंद केजरीवाल यांच्यावरील विश्वास उडाला आहे, असं म्हटलंय. आपला अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षावरून विश्वास उडाला असल्याचं भावना गौड म्हणाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com