Medical Device Reuse: सरकारचा रुग्णालयांना मोठा दणका! सिंगल यूज मेडिकल डिव्हाइस पुन्हा वापरण्यास मनाई, रुग्णांच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल

Single-Use Medical Devices: केंद्र सरकारने एकदाच वापरण्यासाठी तयार केलेल्या वैद्यकीय उपकरणांच्या पुनर्वापराबाबत रुग्णालयांना निर्देश दिले आहेत. कॅथेटर, गाइडवायर, सिरिंज आणि डायलिसिस उपकरणांच्या पुनर्वापरामुळे इन्फेक्शनसह आरोग्यविषयक धोके निर्माण होऊ शकतात. जाणून घ्या या निर्णयामागील कारणे आणि रुग्णांच्या सुरक्षिततेचे महत्त्व.
Medical Device Reuse
Medical Device Reusesaam tv
Published On: 

केंद्र सरकारने देशभरातील सरकारी आणि खासगी रुग्णालयांना एकदाच वापरण्यासाठी तयार केलेली वैद्यकीय उपकरणं आणि शस्त्रक्रियेसाठी लागणारं साहित्य पुन्हा वापरणं पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश दिलेत. अशा उपकरणांचा पुन्हा वापर केल्यास रुग्णांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. गंभीर आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी हा धोका अधिक गंभीर ठरू शकतो, असा इशारा सरकारने दिला आहे.

आरोग्य सेवा महासंचालनालयाने (DGHS) सांगितलं की, एकदाच वापरण्यासाठी तयार केलेली उपकरणं पुन्हा वापरल्यास रुग्णांना इन्फेक्शन होऊ शकतं. तसंच, उपकरणं खराब होणं, त्यांची कार्यक्षमता कमी होणं आणि इतर आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याचा धोका असतो.

Medical Device Reuse
Bad Cholesterol: हार्ट अटॅकचा धोका कमी करतील हे 5 ड्रिंक्स; नसांमध्ये जमा झालेली चरबी काही दिवसांत वितळेल

अशा उपकरणांचा पुन्हा वापर केल्यास 'ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट, 1940', 'मेडिकल डिव्हाइसेस रुल्स, 2017' आणि 'क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट्स ॲक्ट, 2010' या कायद्यांचं उल्लंघन होऊ शकतं. याशिवाय इन्फेक्शन रोखण्यासाठी आणि वैद्यकीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी असलेल्या नियमांचंही उल्लंघन होण्याची शक्यता आहे.

भारतात कोणती एकदाच वापरायची उपकरणं पुन्हा वापरली जातात?

केंद्रीय सरकारी आरोग्य योजना म्हणजेच CGHS ने नोव्हेंबर 2016 मध्ये या विषयावर कार्यालयीन आदेश जारी केला होता. हा आदेश या योजनेशी संबंधित रुग्णालयांसाठी होता. भारतात एकदाच वापरण्यासाठी तयार केलेली काही वैद्यकीय उपकरणं पुन्हा वापरली जात असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. यामध्ये अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टीसाठी वापरले जाणारे कार्डियाक कॅथेटर आणि गाइडवायर, डायलिसिसची उपकरणं, काही शस्त्रक्रियांची उपकरणं, तसंच एकदाच वापरण्यासाठी तयार केलेल्या सिरिंज आणि सुया यांचा समावेश आहे.

या उपकरणांचा पुन्हा वापर केल्यास इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो आणि रुग्णांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण होतात. विशेष म्हणजे उपकरणांचा पुन्हा वापर केला जात असल्याची माहिती रुग्णांना दिली जात नसेल तर ही बाब अधिक गंभीर ठरू शकते.

Medical Device Reuse
Heart blockage: ब्लड प्रेशर नॉर्मल असलं तरी हृदयात ब्लॉकेज असू शकतात? या 6 टेस्ट सांगतील हार्ट अटॅकचा धोका!

रुग्णांच्या आरोग्याला गंभीर धोका

केंद्र सरकारच्या या निर्णयाचं 'असोसिएशन ऑफ इंडियन मेडिकल डिव्हाइस इंडस्ट्री' (AiMeD) या संघटनेने स्वागत केलंय. संघटनेने सांगितलं की, जी वैद्यकीय उपकरणं केवळ एकदाच वापरण्यासाठी तयार केली जातात आणि त्यासाठी प्रमाणित केलेली असतात. त्यांचा पुन्हा वापर केल्यास रुग्णांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.

Medical Device Reuse
Heart attack symptoms: हार्ट अटॅक आला की शरीरात नेमकं काय घडतं? डॉक्टरांनी दिलेल्या माहितीवरून वेळीच धोका ओळखा

AiMeD चे फोरम कोऑर्डिनेटर राजीव नाथ यांनीही या विषयावर भूमिका मांडली. एखादं उपकरण उत्पादक कंपनीच्या सूचनांविरुद्ध जाऊन पुन्हा वापरलं गेलं, तर त्याची जबाबदारी नेमकी कोणाची असेल, हे स्पष्ट केलं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com