Madhya Pradesh: कॉंग्रेस नेत्याचा स्टेजवर फिल्मी स्टाईल गोळीबार ; अमिताभ बच्चन यांच्या 'मैं हूँ डॉन' गाण्यावर नाचत केली भाईगिरी

कॉंग्रेस नेत्याने नवीन वर्षाचे स्वागत करताना हवेत गोळीबार केला आहे.
Madhya Pradesh
Madhya PradeshSaam TV

Madhya Pradesh: मध्य प्रदेशच्या एका कॉंग्रेस नेत्याने नवीन वर्षाचे स्वागत करताना हवेत गोळीबार केला आहे. अनुप्पूर जिल्ह्यातील ही घटना असून सुनील सराफ असे गोळीबार केलेल्या आमदाराचे नाव आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Latest Madhy Pradesh News)

भोपाळपासून ५७० किमी अंतरावर असलेल्या अनुप्पूर जिल्ह्यातील कोतमा येथे ३१ डिसेंबर रोजी जंगी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार सुनील सराफ यांनी अमिताभ बच्चन यांच्या डॉन चित्रपटातील गाण्यावर ताल धरला. व्हायर होत असलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी गोळीबार केल्याचे दिसत आहे.

Madhya Pradesh
Madhya Pradesh : धक्कादायक! प्रेयसीसाठी बापाने पोटच्या मुलाची केली निर्घृण हत्या

मैं हूँ डॉन या गाण्यावर नाचत असताना त्यांनी आपले पिस्तूल बाहेर काढले आणि स्टेजवर चढून हवेत गोळीबार केला. या घटनेची माहिती मिळताच कोतमा पोलिसांनी घटनास्थळी पहाणी केली आहे. तसेच सुनील सराफ यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Madhya Pradesh
Andhra Pradesh : आंध्रप्रदेशात मोठी दुर्घटना! माजी मुख्यमंत्र्यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ७ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

सदर घटनेची माहिती मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांना समजताच त्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. अशात यामध्ये वापरलेली बंदूक फटाक्यांची असल्याचा दावा आमदार सुनील सराफ यांनी केला आहे. सध्या त्यांनी केलेल्या गोळीबाराचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com