Unique Idea: ऐकावे ते नवलच! तरुणी सोशल मीडियावर पायाचे फोटो दाखवून करते लाखोंची कमाई

Unique Idea for Earning: २८ वर्षीय तरुणी सोशल मीडियाच्या माध्यमातून केवळ पायाचे फोटो दाखवून लाखो रुपयांची कमाई करत आहे
representative image
representative imageSaam tv
Published On

New Delhi: सोशल मीडियावर अनेक जण वेगवेगळ्या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई करत आहेत. काही जण अशा प्रकारे पैसे कमाई करत आहेत की, त्याचा विचारच तुम्ही करू शकत नाही. २८ वर्षीय तरुणी सोशल मीडियाच्या माध्यमातून केवळ पायाचे फोटो दाखवून लाखो रुपयांची कमाई करत आहे. ही तरुणी अक्षरश: महिन्याला तब्बल ५ लाख रुपये कमाई करत आहे. (Latest Marathi News)

एका वृत्त संस्थेच्या वृत्तानुसार, कंटेंट क्रिएटर अमेलियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या कमाईबद्दल खुलासा केला आहे. तिने केवळ पायाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून महिन्याला लाखो रुपये कमावत असल्याचे सांगतिले आहे.

representative image
Twitter Limit News : ट्वीट्स स्क्रोल करताना काळजी घ्यावी लागणार, यूजर्सना दिवसभरात फक्त एवढे ट्वीट वाचता येणार

अमेलिया ही सोशल मीडियावर पायाचे सुंदर फोटो आणि त्याच्याशी निगडीत मजकूर शेअर करते. तिला सोशल मीडियावर फॉलो करणारा मोठा वर्ग आहे. अमेलियाने सांगितले की,मला हल्लीच कळालं की, स्वत:चे पाय दाखवून देखील पैसा कमावता येऊ शकतो. अमेलियाने त्यांनंतर FunwithFeet नावाची वेबसाईट तयार केली. अमेलिया या वेबसाईटच्या माध्यमातून ग्राहकांशी संवाद साधते. तसेच अमेलिया सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे

पहिल्या ६ महिन्यात केली चांगली कमाई

अमेलिया पुढे म्हणाली, 'मला सोशल मीडियाच्या माध्यमातून वास्तव कळण्यास काही आठवडे लागले, त्यानंतर कळालं की, पायाचे फोटो दाखवून लाखो रुपयांची कमाई करता येऊ शकते. 'गेल्या ६ महिन्यात साध्या टिप्स सांगून देखील हजारो रुपये कमावले आहेत.

माझा कंटेंट वेगळा आहे...

अमेलियाचं म्हणणं आहे की, 'मी केवळ पायांचे फोटो काढून सोशल मीडियावर शेअर करत नाही. मी त्यासोबत पायाची निगा कशी राखता येईल, याबद्दल लिहित असते. त्यामुळे मला अनेक जण फॉलो करतात. मी सध्या महिन्याला ५.२१ लाख रुपयांची कमाई करत आहे'.

representative image
Gujrat Inner Wear Theif News: दोरीवर वाळत टाकलेली अंतर्वस्त्रे चोरीला जायची, महिलेने शेजाऱ्यावर संशय घेताच झाली कुटाकुटी

दरम्यान, ती पुढे म्हणाली, ' मी आधी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत होती, त्यावेळी मी महिन्याला २.०८ लाख रुपयांची कमाई करत होती. परिचारिका असताना अर्धवेळ कंटेंट क्रिएटर म्हणून देखील काम करत होती. आता मात्र पूर्णवेळ कंटेंट क्रिएटर म्हणून काम करत आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com