Twitter Update : एलॉन मस्क यांच्याकडे मालकी आल्यापासून ट्विटरमध्ये अनेक बदल करण्यात आले आहे. कंपनीतील मॅनेजमेंट बदलांपासून ते ब्लू टिकपर्यंतचे त्यांच्या अनेक निर्णयांची जगभर चर्चा झाली. आता एलॉन मस्क यांनी आणखी एक निर्णय घेतला आहे, ज्याचा परिणाम ट्विटर वापरकर्त्यांवर होणार आहे.
ट्विटरचे नवे सीईओ एलॉन मस्क यांनी आता ट्विटरवर ट्वीट वाचण्याची लिमिट निश्चित केली आहे. ट्वीट करत त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. एलॉन मस्क यांनी केलेल्या ट्वीटनुसार, नॉनव्हेरिफाईड यूजर्स एका दिवसात फक्त 1000 ट्वीट वाचू शकतील. तर व्हेरिफाईड अकाऊंट्समध्ये 10,000 ट्वीट वाचण्याची सुविधा असेल. तसेच व्हेरिफाईड नसलेल्या नवीन ट्विटर अकाऊंट्ना एका दिवसात फक्त 500 ट्वीट पाहण्याची परवानगी असेल.
एलॉन मस्क यांनी शनिवारी रात्री ट्विटरवर लिमिट जाहीर केली. पहिल्या ट्वीटमध्ये त्यांनी सांगितले की, व्हेरिफाईड अकाउंट्स आता फक्त 6000 ट्वीट वाचू शकतील. याशिवाय नॉन व्हेरिफाईड अकाऊंट्स एका दिवसात फक्त 600 पोस्ट वाचू शकतील. तसेच, जे नवीन ट्विटर अकाऊंट्स व्हेरिफाईड झालेले नाही ते एका दिवसात केवळ 300 ट्वीट पाहण्यास सक्षम असतील. (Latest Marathi News)
मात्र, काही वेळानंतर मस्क यांनी आपला निर्णय बदलून नवे ट्वीट केले. या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, आता व्हेरिफाईड अकाउंट 8000 ट्विट वाचू शकणार आहे. नॉन व्हेरिफाईड अकाऊंट्स 800 ट्वीट वाचू शकतील. मात्र त्यानंतर केलेल्या आपल्या ट्वीटमध्ये एलॉन मस्क यांनी ही लिमिट आणखी वाढवली आहे. आता नॉन व्हेरिफाईड अकाउंट्सची लिमिट 1000 तर व्हेरिफाईड अकाउंट्सची लिमिट 10000 करण्यात आली आहे.
शनिवारी ट्विटरची सेवा जागतिक ठप्प झाली आहे. हजारो युजर्सने तक्रार केली होती की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांचे ट्वीट रिफ्रेश नाही होत आहे. ट्विटर युजर्सनी की, प्लॅटफॉर्म वारंवार 'cannot retrieve tweets' एरर दाखवत आहे. यावर्षी तिसऱ्यांदा युजर्सला या संसेला सामोरे जावे लागत होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.