Twitter Down: ट्विटरची सेवा जगभरात ठप्प, युजर्स झाले हैराण

ट्विटरची सेवा जगभरात ठप्प, युजर्स झाले हैराण
Twitter Down
Twitter DownSaam Tv
Published On

Twitter Down: शनिवारी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटरची सेवा जागतिक ठप्प झाली आहे. हजारो युजर्सने तक्रार केली आहे की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांचे ट्वीट रिफ्रेश नाही होत आहे. ट्विटर युजर्सनी की, प्लॅटफॉर्म वारंवार 'cannot retrieve tweets' एरर दाखवत आहे. यावर्षी तिसऱ्यांदा युजर्सला या संसेला सामोरे जावे लागत आहे.

ऑनलाइन सर्व्हिसवर लक्ष ठेवणाऱ्या डाउन डिटेक्टर या वेबसाइटने म्हटले आहे की, जवळपास ४,००० युजर्सला ट्विटर वापरताना अडचण येत आहे.

Twitter Down
Cm Shinde Thackeray Group BMC Morcha: 'आजचा मोर्चा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा', मुख्यमंत्री शिंदे यांचा हल्लाबोल

याआधी मार्च २०२३ मध्ये ट्विटरच्या सिस्टममध्ये अडचणी निर्मण झाल्या होत्या. ज्यामुळे ट्विटरच्या अनेक लिंक्स ओपन होत नव्हत्या. त्याचप्रमाणे या वर्षी फेब्रुवारीमध्य ट्विटरचे अनेक युजर्सला एखादं ट्वीट करणं, एखाद्याला फॉलो करणं आणि पोस्ट करण्यामध्ये अडचण येत होत्या. (Latest Marathi News)

११ लाखांहून अधिक अकाउंट बंद

दरम्यान, ट्विटरने आपल्या प्लॅटफॉर्मवर चुकीच्या गोष्टी वाढू नयेत यासाठी कठोर कारवाई केली आहे. कंपनीने २६ एप्रिल ते २५ मे दरम्यान भारतातील एकूण ११,३२,२२८ अकाउंटवर बंदी घातली आहे.

Twitter Down
Teesta Setalvad: सर्वोच्च न्यायालयाचा तिस्ता सेटलवाड यांना दिलासा; गुजरात दंगलीशी संबंधित आहे प्रकरण, वाचा सविस्तर...

बाल लैंगिक शोषण आणि दहशतवादाशी संबंधित धोरण उल्लंघनासाठी या अकाउंटवर हे निर्बंध लादण्यात आले होते. Twitter ने म्हटले आहे की, बहुतेक अकाउंटवर गैरवर्तन आणि बदनामी करण्याच्या हेतूने एखाद्याविषयी पोस्ट केल्यामुळे बंदी घालण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com