Cm Shinde Thackeray Group BMC Morcha: 'आजचा मोर्चा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा', मुख्यमंत्री शिंदे यांचा हल्लाबोल

'आजचा मोर्चा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा', मुख्यमंत्री शिंदे यांचा हल्लाबोल
Cm Eknath Shinde Thackeray Group BMC Morcha
Cm Eknath Shinde Thackeray Group BMC MorchaSaam TV
Published On

Cm Eknath Shinde Thackeray Group BMC Morcha: कोविड सेंटरच्या नावाखाली करण्यात आलेल्या गैरव्यवहारांची ईडी कडून चौकशी सुरु झाल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे जनतेची दिशाभूल करण्यासाठी मोर्चा काढला जात आहे. मात्र जनता त्यांच्या या भूलथापांना फसणार नाही. आज काढण्यात आलेल्या मोर्चाचे ठिकाण चुकले आहे. खरा मोर्चा मातोश्री १ ते मातोश्री २ दरम्यान काढण्याची खरी गरज होती, कारण जो काही गैरव्यवहार झाला आहे, तो याच ठिकाणी झाला आहे, असा हल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर चढवला आहे.

बाळासाहेबांची शिवसेना पक्षात युवासेनेच्या कोअर कमिटीचे राहुल कनाल व वर्धा जिल्ह्यातील करंजा नगरपरिषदेतील १० नगरसेवकांच्या प्रवेशानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

Cm Eknath Shinde Thackeray Group BMC Morcha
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावरील अपघातांचा तज्ञांमार्फत अभ्यास होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

समृद्धी महामार्गावर बुलढाणा येथील अपघातात २६ जणांचा मृत्यू झाल्याने संवेदनशील असल्याने भाजपने मोर्चा रद्द केला. मात्र कोणतीही संवेदना न उरलेल्या व केवळ राजकारण करणाऱ्यांनी मोर्चा काढला, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. (Latest Marathi News)

आजचा मोर्चा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. कोविड सेंटर लोकांना जगवण्यासाठी बनवली होती की मारण्यासाठी हा प्रश्न निर्माण झाला आहे. बोगस कोविड सेंटर, बोगस डॉक्टर, बोगस ऑक्सिजन प्लँट उभारण्यात आले, सदोष ऑक्सिजन प्रकल्पामुळे रुग्णांना ब्लॅक फंगस आजार झाला. एवढेच नव्हे मृतांच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्यांनी कोविड काळातील मृत व्यक्तींचे मृतदेह नेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बॉडीबॅगसाठी सहाशे रुपयांऐवजी तब्बल साडे सहा हजार रुपये खर्च केले. आम्ही ठाण्यात तीच बॅग अवघ्या ३२५ ला बॅग घेतली. काहीजण ठाण्यातील व्यवहारांची चौकशी लावण्याची चर्चा करत आहेत. मात्र कोणताही गैरव्यवहार झालेला नसल्याने बिनधास्त चौकशी लावा, असे आव्हान मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिले.

Cm Eknath Shinde Thackeray Group BMC Morcha
Samruddhi Mahamarg Accident: 'अम्मी जा रही हूँ', जोयाचे ते शब्द ठरले शेवटचे

ठाण्यात कोविड कालावधीत आम्ही १२०० बेडचे रुग्णालय महापालिकेच्या निधीशिवाय उभारले, मोफत रेमडेसिवीर वाटले, असे मुख्यमंत्री म्हणाले. महापालिकेत झालेल्या गैरव्यवहारांबाबत ईडी चौकशी करत आहे, ही चौकशी आम्ही लावली नाही, मात्र चौकशी सुरु झाल्याने घाबरलेल्या विरोधकांनी आमच्यावर आरोप करण्यास सुरुवात केली.

मुंबईत सिमेंट क्रॉकिटचे रस्ते २० वर्षापूर्वी करायची गरज होती, तर महापालिकेचे साडेतीन हजार कोटी रुपये वाचले असते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. शिवसेना भाजपचे युती सरकार राज्यात आल्यावर आम्ही विकासकामांचा धडाका लावला आहे. त्यामुळे विरोधकांना पोटदुखी झाली आहे, ती पोटदुखी पळवण्यासाठी आम्ही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु केला आहे, असा टोला त्यांनी लगावला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com