Family Suicide, Panchkula Incident, Financial Crisis : हरियाणाच्या पंचकूलामध्ये धक्कादायक आणि हादरवणारी घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील सात जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याच्या घटनेने पंचकूलामध्ये खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणारे हे कुटुंब देहरादूनचे रहिवासी होते. सर्व मृतदेह पंचकूलाच्या सेक्टर-27 मधील एका घराबाहेर रस्त्यावर उभ्या असलेल्या गाडीत आढळले.
सूत्रांनुसार, प्रचंड कर्ज आणि आर्थिक तंगीमुळे व्यथित होऊन या कुटुंबाने हे भयानक पाऊल उचलले आणि गाडीत विष प्राशन केले. देहरादूनचे रहिवासी प्रवीण मित्तल (वय 42) आपल्या कुटुंबासह पंचकूलामध्ये आयोजित बागेश्वर धामच्या हनुमंत कथा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर देहरादूनला परतताना त्यांनी आत्महत्या केली.
मृतांमध्ये प्रवीणचे आई-वडील, पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा यांचा समावेश आहे. घटनास्थळावरून पोलिसांना एक सुसाइड नोटही सापडली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, सर्व सात मृतदेह पंचकूलातील खासगी रुग्णालयांच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत.
पंचकूला डीसीपी हिमाद्री कौशिक आणि डीसीपी अमित दहिया यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. त्याशिवाय घटनास्थळावर फॉरेन्सिक पथकाने नमुने तपासणीसाठी गोळा केले आहेत. डीसीपी हिमाद्री कौशिक यांच्या मते, प्राथमिकदृष्ट्या ही आत्महत्येची घटना वाटते. याप्रकरणी सखोल तपास केला जाईल.
दिल्लीच्या बुराडी कांडाची आठवण
या घटनेने दिल्लीतील 2018 च्या बुराडी कांडाची आठवण करून दिली आहे. त्या वेळी उत्तर दिल्लीतील बुराडी येथे एकाच कुटुंबातील 11 सदस्य मृतावस्थेत आढळले होते. त्यापैकी 10 जणांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडले, तर सर्वात वयोवृद्ध महिला नारायणी देवी यांचा मृतदेह घरातील दुसऱ्या खोलीत जमिनीवर पडलेला होता. या घटनेने संपूर्ण देशाला एक धक्का दिला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.