Shoking News : जेवणात मीठ कमी पडल्याने गर्भवती महिलेला गमवावे लागले प्राण

Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशातील कासगंज येथे ब्रजबाला या ६ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा जेवणात मीठ कमी पडल्यामुळे पती व जावेने छतावरून ढकलून दिल. तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून पोलीस तपास सुरु आहे.
pregnant women death
pregnant women deathSaam tv
Published On

उत्तर प्रदेशातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील कासगंज येथे गर्भवती महिलेला जेवणात मीठ कमी पडल्याने जीव गमवावा लागला आहे. २८ वर्षीय ब्रजबालाचे ४ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. ४ वर्षांनंतर ती गर्भवती राहिली होती. बुधवारी जेवण बनवत असताना तिच्या हातून जेवणात मीठ कमी पडल्याने पतीने आणि जावेने तिला छतावरून ढकलले.

उत्तर प्रदेशातील कासगंज येथे ढोलणा परिसरातील नागला ढाक गावात राहणाऱ्या ब्रजबालाचं ४ वर्षांपूर्वी लग्न झालं होत. ती ६ महिन्यांची गरोदर होती. बुधवारी स्वयंपाक करत असताना ब्रजबालाने जेवणात चुकून मीठ कमी टाकले होते. हे तिच्या पतीच्या आणि जावेच्या लक्षात आल्याने त्यांनी ब्रजबालाला छतावरून ढकलले.

pregnant women death
Uttar Pradesh : कुत्रा चावल्यामुळे मृत्यू, राज्यस्तरीय कब्बड्डीपटूने गमावला जीव | VIDEO

या घटनेनंतर तिच्या सासूने तिला उपचारांकरिता रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ब्राजबालाच्या भावाने तिच्या पती आणि जावे विरुद्धात तक्रार नोंदवली आहे. तिच्या भावाच्या तक्रारीनुसार ब्रजबालाच्या पतीचे तिच्या जावेशी प्रेमसंबंध होते. यामुळे ब्रजबाला आणि तिच्या पतीचे सतत भांडण होत होते.

pregnant women death
Uttar Pradesh Crime: संतापजनक! ८० वर्षांच्या महिलेवर गावातल्याच २४ वर्षीय तरूणानं केला बलात्कार

बुधवारी ब्रजबालाने घरी डाळ शिजवली होती ज्यामध्ये चुकून कमी मीठ टाकण्यात आले होते. याआधीही ब्रजबाला आणि तिच्या पतीमध्ये वाद झाला होता. वादानंतर ब्रजबालाच्या पती आणि मेहुणीने तिला छतावरून ढकलल्याचा आरोप ब्रजबालाच्या भावाने केले आहे.या घटनेनंतर ब्रजबालाचे माहेरचे कुटुंब हादरले आहे. या घटनेप्रकरणी पोलीस अधिकचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com