4 Trekkers Dead: उत्तराखंडामध्ये मोठी दुर्घटना; ४ ट्रेकर्सचा मृत्यू, ; १३ जणांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु

Uttarakhand News: उत्तराखंडमधून एक अपघाताची बातमी समोर आली आहे. ट्रेकसाठी गेलेल्या चार ट्रॅकर्सचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Uttarakhand News
4 Trekkers DeadSaam Tv

उत्तरकाशीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. उत्तरकाशीतील सहस्त्रताल येथे जात ट्रेक्रिंकसाठी जात असलेल्या ४ ट्रेकर्सचा दुर्देवी मृत्यू झाआला आहे. उर्वरित १३ ट्रेकर्स खराब वातावरणामुळे अडकल्याती माहिती समोर येत आहे. अडकलेल्या ट्रेकर्सन वाचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बचाव कार्याला सुरुवात केली आहे.

Uttarakhand News
International Tea Day: जगभरात आंतरराष्ट्रीय चहा दिन का साजरा केला जातो? काय आहे इतिहास

इंडिया एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, जिल्ह्या अधिकाऱ्यांनी एसडीआरफ (SDRF)मुख्यालयाला घटनास्थळी तात्काळ बचाव पथके पाठवण्याची विनंती केली आहे शिवाय स्थानिक बचाल पथकाचीही मदत घेण्यात येणार आहे. हवाई दलाच्या माध्यमातून अडकलेल्या ट्रेकर्सना वाचवण्यासाठी आणि मृतांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदत होत आहे.

जिल्ह्या दंडाधिकाऱ्यांनी घोषित केले की बचाव पथकांची एक वेगळी टीम तयार केली जाईल. त्यात पोलीस आणि एसडीआरफचे कर्मचारी आणि ट्रेक मार्गा बद्दल माहिती असलेल्या स्थानिक मार्गदर्शकांसह ही टीम घटनास्थळी रवाना होईल.

हिमालय(Himalaya) व्ह्यू ट्रेकिंग एजन्सीने २९मे रोजी कळवळे की, कर्नाटकातील साधारण १८ सदस्य आणि महाराष्ट्रातील १ आणि तीन स्थानिक मार्गदर्शकांचा समावेश आहे. हे सर्व सहस्त्रताल या ठिकाणी ट्रेकसाठी निघाली होती. सर्व ७ जून पर्यत परत येणे अपेक्षिक होते मात्र सोमवारी सहस्त्रतालकडे येत असताना खराब वातावरणामुळे ४ ट्रेकर्सचा रस्ता चुकला आणि अन्यजण अडकले. त्यातच ट्रॅकिंग एजस्नीने तपासाअंती त्या टीममधील ४ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद केली

जिल्हा दंडाधिकारी यांनी सांगितले की सहस्त्रताल हे ठिकाण सुमारे ४१००० ते ४४०० मीटर उंचीवर आहे. घटनास्थळ हे उत्तरकाशी जिल्हा आणि टिहरी जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात आहे. त्यामुळे संघाच्या तात्काळ बचावासाठी उत्तरकाळी तसेच घणसाली टिहरी या ठिकाणाहून दोन्ही बाजूंच्या बचाव पथकांना हिमालयात पाठवण्याचे प्रयत्न सुरु केलेत.

Uttarakhand News
Mumbai International Airport News: मुंबई विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन; पोलिसांसह यंत्रणा सतर्क

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com