Railway Budget 2024: 39 हजार पदांची भरती, अर्थसंकल्पात रेल्वेसाठी काय झाल्या घोषणा? वाचा...

Budget 2024: मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी रेल्वेसाठी 2.62 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या वर्षी रेल्वेत नवीन 39 हजार पदांची भरती करण्यात येणार आहे.
39 हजार पदांची भरती केली जाणार, अर्थसंकल्पात रेल्वेसाठी काय झाल्या घोषणा? वाचा...
Railway Budget 2024Saam Tv
Published On

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024 च्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी रेल्वेसाठी 2.62 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या वर्षी रेल्वेत नवीन 39 हजार पदांची भरती करण्यात येणार आहे, असंही या अर्थसंकल्पात सांगण्यात आलं आहे.

मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. यामध्ये गाड्यांची संख्या वाढवणे, रेल्वे ट्रॅकचे विद्युतीकरण आणि नवीन गाड्या चालवणे यावर भर देण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या रेल्वे अपघातांच्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या सुरक्षेसाठी वेगळे बजेटही करण्यात आले आहे. निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात याचा उल्लेख केला नाही, मात्र अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालात त्याचा तपशीलवार उल्लेख करण्यात आला आहे.

39 हजार पदांची भरती केली जाणार, अर्थसंकल्पात रेल्वेसाठी काय झाल्या घोषणा? वाचा...
Angel Tax : 'एंजल टॅक्स' काय आहे? जे रद्द करण्याची अर्थसंकल्पात झाली घोषणा; जाणून घ्या

अलीकडचे रेल्वे अपघात पाहता अर्थसंकल्पात रेल्वे सुरक्षेवर भर देण्यात आला आहे. अर्थसंकल्पात यासाठी 1.08 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय जुने रेल्वे रुळ दुरुस्त करणे, विद्युतीकरणाची कामे केली जाणार आहेत.

सिंगल ट्रॅकचे दुहेरी ट्रॅकमध्ये रूपांतर केले जाईल. सिग्नल्सचे संगणकीकरण होईल. 2500 सामान्य डबे बनवण्यासोबतच रेल्वे 10,000 अतिरिक्त सामान्य श्रेणीचे डबे बनवणार आहे. अपूर्ण रेल्वे पुलासह बोगद्यासह रेल्वे ओव्हरब्रिज आणि अंडरब्रिजचे कामही वेगाने करण्यात येणार आहे.

39 हजार पदांची भरती केली जाणार, अर्थसंकल्पात रेल्वेसाठी काय झाल्या घोषणा? वाचा...
Angel Tax : 'एंजल टॅक्स' काय आहे? जे रद्द करण्याची अर्थसंकल्पात झाली घोषणा; जाणून घ्या

हायस्पीड गाड्यांच्या संख्येवर रेल्वे पूर्ण भर देईल. त्यासाठी दिल्ली-मुंबई रेल्वे ट्रॅक अपग्रेड करण्यात येणार आहे. याशिवाय वंदे भारत आणि इतर सेमी हायस्पीड गाड्यांची संख्याही वाढवण्यात येणार आहे. वंदे भारत ट्रेनमधील स्लीपर कोच अपग्रेडेशनच्या कामालाही वेग येईल. निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पातही याची घोषणा केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com